आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यातले शितयुद्ध विकोपाला पोहचले आहे. संजय शिरसाट यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाकडे धाव घेतली. शिरसाटांविरोधात अब्रुनुकसानीचा तीन रुपयांचा दाखल केला. आता त्यानंतर संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
व्हिडिओवर आधी हिंदू देव-देवतांची टिंगल आणि आता चक्क देवीची आरती, अशी फोटोओळ आहे. सुषमा अंधारे यांचे हे जुने भाषण आहे. त्यावर त्या काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागेल.
सगळ्या जिंदगीत घट
संजय शिरसाट यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सुषमा अंधारे म्हणतात की, तिकडे दसरा मेळावा सुरू आहे. इकडे सगळीकडे उगी दसऱ्याचे महत्त्व. काय कमाल आहे. बायकापण...आमच्या येड्या-खुळ्या बाया. नऊ दिवस बायांचा खेळ. तुम्ही इथे आलेल्या चांगल्या बाया बरं का. तुमचं नाही. मी दुसऱ्या बायकांबद्दल बोलते आहे. तुम्ही म्हणजे एक नंबर हो. तुम्ही म्हणजे काय सांगायचे राजेहो. तुम्ही म्हणजे बाबासाहेबांचे लई फॉलोअर. ज्या बायका नवरात्रीत उसता घट, बसता घट करतात. सगळ्या जिंदगीत घट. घटच घट. नऊ दिवस खेळ. तुम्ही लई चांगल्या बाया.
बाप बसत नाही कधी?
सुषमा अंधारे व्हिडिओत पुढे म्हणतात की, हा प्रतीक्रांतीचा विचार आहे ना. बाया नऊ दिवस पायात चप्पल घालत नाहीत. आयो चप्पल घाला, म्हणतात आई बसली. अहो पलंगावर बसा, आई बसली. अहो गादीवर बसा, आई बसली. बाया नऊ दिवस जिवाला काही खात नाहीत. नऊ दिवस नवरात्रीचे उपवास करतात. नुसता साबुदाणा खातात. साबुदाणा म्हणजे फायबर असते. प्लास्टिक असते. सिंथेटिक आहे. गर्भाशयाला अपाय होतो. हल्ली चाळीस-पंचेचाळीस वयोगटातल्या बायांना गर्भाशयाचा कॅन्सर होतो. याचे खूप प्रमाण वाढले आहे. साबूदाणा तुमच्या जीवाला अपायकारक आहे. तरी बाया साबूदाण्याची खिचडी नऊ दिवस खाताहेत. अगं बाई भाकर खा,आई बसली. मायच बसते का सारखी. बाप बसत नाही कधी?
सरस्वती बाईंनी कधी शिकवले?
सुषमा अंधारे व्हिडिओत पुढे म्हणतात की, मग बायकांची गाणी काय. अनवाणी पायांनी महालक्ष्मीला जाणारे नग आहेत इथे. लेकरं कॉलेजात चालले. कॉप्या करून पास व्हायले, का लाइनी मारायले कळेना गेले. घट चांदीयाचा दिसतोय. आमच्या बाया अंबाबाईच्या चोळीला बटण लावायला निघाल्या आहेत. घरात लेकराच्या शर्टच्या गुंड्या तुटल्यात. लेकरं उघड्या ढेऱ्या घेऊन गल्ली गल्लीत फिरायला लागलेत. ते दिसत नाही. आणि अंबाबाईच्या चोळीला बटण लावायाची तयारी. काय धंदे. आमच्याकडे एकही पुरावा नाही सरस्वती बाई कधी मोरावरून उतरल्या आणि कधी आम्हाला शिकवल्या. आम्हाला काहीच माहित नाही.
वाऱ्या करता-करताच...
सुषमा अंधारे व्हिडिओत पुढे म्हणतात की, बायका गुरुवार करायला लागल्यात. शुक्रवार करायला लागल्यात. किती नादय बायकांना. त्यांना विचारले पोराचे नाव काय? म्हणतात, याचे नाव वैभव ठेवलंय. वैभवलक्ष्मीचे गुरुवार करत होते. त्यानंतर हा झाला. याचे नाव संतोष ठेवलंय. संतोषी मातेचे शुक्रवार होते. त्यानंतर हा झाला. हीचे नाव रेणुका ठेवले. पोरगं झालं, तर परशुराम नाही तर रेणुका. याचे नाव नरेंद्र ठेवले. नाणीजच्या वाऱ्या करत होते ना. वाऱ्या करता-करताच झालं.
प्रोडक्शन एका कंपनीचे...
सुषमा अंधारे व्हिडिओत पुढे म्हणतात की, तुकोबारायांनी क्रांतीचा विचार मांडला. नवसे सायासे पुत्रे होती, तेथे काय करणे लागे पती. बायांना लग्ने करायची गरज पडली नसती. हे मी नाही म्हटले. तुकोबारायांनी म्हटले. आय एम दी पोस्टमन. पोलिसांना अक्षेप असेल तर जावा वैकुंठात. नवऱ्याच्या नवसाचे एकांदं हाय का नाही. भारत असा कसा गजब लोकांचा देश आहे बरं. प्रोडक्शन एका कंपनीचे, लेबल दुसऱ्याच कंपनीचे. आमची ब्राह्मण समुदायाची भगिनी स्वच्छेतेच सगळे नियम पाळते. मास, मच्छी खात नाही. तिच्या अंगात देव येत नाही. आम्ही सगळे मटणे पचवणारे. शिव्यांची लाखोली वाहणारे. तुमच्या अंगात देव कसा यायला, काय चाललं नेमकं, असा सवाल त्यांनी केला.
संबंधित वृत्तः
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.