आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:दामिनी पथकाच्या प्रमुखपदी सुषमा पवार; पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांचे आदेश जारी

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

शहर पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी शुक्रवारी संध्याकाळी जाहीर झाली. यात दौलताबाद पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांची सुरक्षा शाखेत बदली झाली, तर फेब्रुवारी महिन्यात शहरात रुजू झालेल्या सुनीता मिसाळ यांची दौलताबादेत नियुक्ती झाली. दामिनी पथकाच्या निरीक्षक पदाची जबाबदारी सुषमा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली. त्या आधी भरोसा सेलमध्ये होत्या.

नुकत्याच झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यात शहरात पोलिस निरीक्षकांची बदली झाली होती, तर काहींना पदोन्नती मिळाली होती. मात्र, ते तेव्हापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी शुक्रवारी यातील काही निरीक्षकांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. त्यात एमआयडीसी वाळूजच्या दुय्यम निरीक्षकपदी श्यामकांत पाटील, जनार्दन शेवाळे वाहतूक शाखा, आम्रपाली तायडेंना भरोसा सेलच्या निरीक्षकपदी नेमण्यात आले. सर्वांनी नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी तत्काळ हजर होण्याचे आदेश पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी नियुक्त झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...