आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप, शिंदेसेनेचे प्रत्युत्तर:सुषमाताई उद्धवसेनेचे हिंदुत्व गर्द अंधारात ढकलत आहेत, बाळासाहेब ठाकरेंना काय वाटत असेल

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे उद्धवसेनेचे हिंदुत्व पूर्ण ताकदीने गर्द अंधारात ढकलत आहेत. ते पाहून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना काय वाटत असेल, याचा विचार उद्धव ठाकरे समर्थकांनी करावा, असा खोचक सल्ला देणारे प्रत्युत्तर भाजप, शिंदेसेनेकडून देण्यात आले.

अंधारे यांनी गेल्या तीन दिवसांत औरंगाबाद, पैठण, सिल्लोडला जाहीर सभा घेऊन भाजप आणि शिंदेसेनेवर प्रखर टीका केली. त्याविषयी भाजपचे शहरप्रमुख शिरीष बोराळकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी वारंवार आमचे हिंदुत्व शेंडी, जानव्याचे नाही, असे जाहीर केले. आता सुषमाताई त्यापुढे जाऊन उद्धवसेनेचे हिंदुत्व गर्द अंधारात ढकलत आहेत. ज्वलंत, प्रखर हिंदुत्वच गायब करून टाकत आहेत. त्यामुळे पुढील काळात उद्धवसेनेची प्रचंड घसरण होणार आहे. शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ म्हणाले की, सुषमाताई यापूर्वी मानधन देऊन व्याख्याने देत होत्या. त्यामुळे ही त्यांची महाप्रबोधन नव्हे, नुसती धन यात्रा आहे. त्या स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसमधून उद्धवसेनेत आल्या. त्यासाठी त्यांनी किती खोके घेतले? त्या उद्धवसेनेचे उरलेसुरले हिंदुत्वही संपवून टाकत आहेत. बहुधा त्यासाठीच त्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून आल्या असाव्यात.

उद्धव-आदित्यवर अंधारेंच्या आधी भाषण करण्याची वेळ येईल जे चंद्रकांत खैरे दररोज पूजाअर्चा केल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत, उद्धव ठाकरेंसाठी यज्ञ, व्रतवैकल्ये करतात, त्यांना अंधारेंचे हिंदुत्व मान्य आहे का, असा सवाल बोराळकर यांनी केला. तर उद्धवसेनेचे सर्वेसर्वा असलेल्या उद्धव-आदित्य यांच्यावर अंधारे यांच्याआधी भाषण करण्याची वेळ येईल, असे जंजाळ म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...