आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:सेवेतून कमी करण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; आरोग्यसेविकांची मागणी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील कार्यरत कंत्राटी आरोग्यसेविकांना सेवामुक्त करण्याचे आदेश अभियान आयुक्तांनी दिले आहेत. या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी आरोग्यसेविकांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी विकास मीना यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.राज्यात २००५ पासून राज्यातील ५९७ कंत्राटी आरोग्यसेविकांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय अभियान आयुक्तांनी घेतला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके यांनी जिल्ह्यातील आठ आरोग्यसेविकांना नोटीस दिली आहे.

गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून आरोग्यसेविका तुटपुंज्या मानधनावर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना कार्यमुक्त करू नये, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर नंदाताई राठोड, कल्पना म्हसदे, रुक्मिणी लाड, लता परदेशी, सुरेखा पचलोरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...