आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यापूर्वीही काढली होती छेड, कपडे फाटेपर्यंत मारले:महिलेचा विनयभंग केल्याने निलंबित फौजदाराला चोप

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जवाहरनगरमधील मयूरबन कॉलनीत फेब्रुवारीत फौजदाराने मद्याच्या नशेत महिलांसमोर कपडे काढत अश्लील कृत्य केले होते. त्यामुळे निलंबित झालेल्या या फौजदाराने मंगळवारी सायंकाळी पुन्हा महिलांसमोर अश्लील प्रकार केला. एका महिलेचा हात धरून त्याने दोन वेळा ‘आय लव्ह यू’ म्हटले. पुन्हा तिचा हात पकडण्याचा प्रयत्न करत धिंगाणा घातला. या प्रकारामुळे नागरिकांनी त्याला कपडे फाटेपर्यंत चोप दिला. त्यानंतर त्याला जवाहरनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अनिल विश्वनाथ बोडले (५४) असे त्याचे नाव असून, त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

३२ वर्षीय तक्रारदार महिला शिवनगर परिसरात राहते. ४ एप्रिल रोजी सायंकाळी त्या घरात होत्या. तेव्हा एका बुलेटस्वाराने तिला दोन वेळेस ‘आय लव्ह यू,’ म्हटले. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने दरवाजा लावून घेत शेजारील महिलेला सांगितले. त्यानंतर मोबाइलवरून पतीला घडलेला प्रकार सांगितला.

काही वेळाने तो पुन्हा आला. त्याने एक, दोन महिलांचे हात पकडले. तोपर्यंत तेथे जमाव जमला. मद्यधुंद अवस्थेत त्याने धिंगाणा घातला. तेव्हा स्थानिकांनी तो फौजदार बोडले असल्याचे ओळखले. त्यानंतर त्याला चांगलाच चोप दिला. हा प्रकार नियंत्रण कक्षाला कळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेतले. तोपर्यंत त्याचे कपडे फाटले होते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत ठाण्यात नेले.