आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:वसमतच्या औद्योगिक वसाहतीमध्ये 27 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एका 27 वर्षीय तरुणाचा शुक्रवारी संशयास्पद रित्या मृतदेह आढळून आला आहे . सुनील नामदेव साळवे राहणार बेरूळा असे मयत तरुणाची नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ तालुक्यातील बेरूळा येथील सुनील नामदेव साळवे हा मागील दीड ते दोन महिन्यापासून वसमत येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एका खाजगी कंपनीत रखवालदार म्हणून कामाला होता. मात्र पाच दिवसापूर्वी त्याला कामावरून कमी करण्यात आले होते.

 दरम्यान आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह औद्योगिक वसाहतीच्या  रस्त्याच्या बाजूला आढळून आला. या घटनेची माहिती नागरिकांनी वसमत ग्रामीण पोलिसांना दिली. त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, जमादार भुजंग कोकरे, बालाजी मिरासे, राहुल नरवाडे, संदीप सुरोशे, निवृत्ती बडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

 पोलिसांनी मयत सुनील यांच्या मृतदेहाची पाहणी केली असता त्यांचा गळा आवळलेल्या स्थितीत आढळून आला. गळ्याभोवती दोरी असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांची नेमकी आत्महत्या का खून हा प्रश्न कायम आहे. पोलिसांनी त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवला आहे. वैद्यकीय अहवालानंतरच पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.