आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राथमिक अहवाल:औरंगपुऱ्यात तरुणाचा संशयास्पद मृत्यू; खुनाचा आरोप

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगपुऱ्यातील महात्मा जोतिबा फुले चौकात सदानंद सुभाष वरपे (२९, रा. नारळीबाग) या तरुणाचा शनिवारी रात्री १२:३० वाजता संशयास्पद मृत्यू झाला. ताे मित्रासोबत चौकात गेल्यानंतर जखमी अवस्थेत आढळला. त्याचा पहाटे घाटीत मृत्यू झाला. दरम्यान, अंगावर जखमा असून त्याचा खुन झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबाने व्यक्त केला आहे.

खासगी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणारा सदानंद शनिवारी रात्री काम करून घरी परतला होता. परिसरातील मित्राने बोलावल्याने त्यांना भेटण्यासाठी तो घराबाहेर पडला. डोक्याच्या आतील भागातून रक्तस्राव झाल्याचे डॉक्टरांनी प्राथमिक अहवालात नमूद केले. मात्र, तोंडावर काही जखमा असल्याने त्याला मारहाण होऊन खून झाल्याचा संशय कुटुंबाने व्यक्त केला. शवविच्छेदनानंतर अधिक तपासासाठी व्हिसेरा राखून ठेवला असून डॉक्टरांच्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल व त्या दिशेने तपास केला जाईल. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असल्याचे निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी सांगितले. हवालदार एस. व्ही. दापके तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...