आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोयाबीनचे दर कोसळल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक होत, परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवार दि. 25 सप्टेंबर रोजी जोडे मारो आंदोलन केले आहे. यावेळी आंदोलकांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळयास जोडे मारून जाहीर निषेध केला आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे शेती आणि शेतकरी देशोधडीला लागला आहे. या वर्षी सोयाबीन पेरणीच्या काळात महाग बियाणे घेऊन पेरणी करावी लागली आहे. तसेच बियाण्यांसोबतच खते व किटकनाशक यांचे भाव देखील गगणाला भिडलेले आहेत. मात्र गेल्या एक महिण्यापर्यंत सोयाबीनचे दर दहा हजार रुपयांवर कायम होते. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरुन निघेल आणि हातात चार पैसे शिल्लक राहण्याची आशा निर्माण झाली होती.
दरम्यानच्या काळात लाखो क्विटल सोयाबीन पेंड आयात करण्याचा आणि खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी करण्याचा घातक निर्णय केंद्र सरकारने घेतला. या निर्णयाला कोणत्याही राज्य सरकारने विरोध करुन शेतकऱ्यांची काळजी घेतलेली नाही. याचा परिणाम सोयाबीन पिक पदरात पडण्याच्या वेळेस बाजारातील सोयाबीनचे भाव प्रचंड प्रमाणात गडगडले आहेत. दरम्यान, सोयाबीन पिकाचे लागवड खर्चही भरुन निघणार नाही अशी परिस्थीती निर्माण झाली आहे.
सध्या नविन सोयाबीन पिक येण्याला सुरवातच झाली आहे. हे दर पुन्हा वरचेवर कोसळण्याची शक्यता झाली आहे. म्हणून आम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा परभणीच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारच्या पुतळयाला जोडे मारो आंदोलन करुन जाहीर निषेध नोंदवत असल्याचे म्हटले आहे.
या आंदोलनास किशोर ढगे, डिगांबर पवार, भास्कर खटीग, जाफर भाई तरोडेकर, मुंजाभाऊ लोडे, गजानन तुरे, माऊली लोडे, अंकुश शिंदे, विकास भोपाळे, रामप्रसाद गमे, सुशिल रसाळ, हनुमान भरोसे, पांडुरंग खींग, अजय खटींग, संजय खटींग, वैजनाथ खटींग, गजानन खटींग, राजु खटींग, प्रसाद खटींग, बाळुकाका गरुड, दत्ता गरुड, गजानन दुगाणे, माऊली शिंदे, काशिनाथ शिंदे, उध्दव जवंजाळ, मधुकर चोपडे आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.