आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:सोयाबीन कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचे कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन

हिंगोली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन फसवणूक करणाऱ्या महाबीज सह इतर खासगी कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. २) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आंदोलन केले.

जिल्ह्यामध्ये सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढू लागले आहेत आतापर्यंत साडेसहा हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार दाखल केल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने पंचनामे देखील केले जात आहे.  मात्र अद्याप पर्यंत ही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून संबंधित कंपन्यांवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज दुपारी एक वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठाण मांडले. यावेळी तालुकाअध्यक्ष रावसाहेब अडकिने, नामदेव पतंगे, बाबुराव गरड, सुभाषराव गाडगे, प्रमोद शिंदे, पराग अडकिने, नारायण कदम, गोपीनाथ बहादुरे, ऋषीकेश बर्बे, यांच्यासह स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी श्री कानवटे उपस्थित होते. मागील वेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खुर्च्यांची तोडफोड केल्यामुळे यावेळी असा प्रकार होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता.

दरम्यान जोपर्यंत गुन्हे दाखल केली जात नाही तोपर्यंत कार्यालयातून उठणार नाही अशी भूमिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी लोखंडे यांनी या प्रकारणात शुक्रवारी तारीख ३ संबंधीत कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन दोन तासानंतर मागे घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...