आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणा:सीआयआयवायच्या अध्यक्षपदी स्वप्निल अन्सारवाडेकर ; ताज हॉटेलमध्ये झाली नियुक्ती जाहीर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील तरुण उद्योजकांसाठी काम करत असलेल्या सीआयआयवायया संस्थेच्या औरंगाबाद शाखेच्या अध्यक्षपदी स्वप्निल अन्सारवाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. ताज हॉटेलमध्ये शुक्रवारी (१६ डिसेंबर) आयोजित सोहळ्यात ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. या वेळी सीआयआयवायचे राज्य अध्यक्ष श्रीराम नारायणन, प्रादेशिक अध्यक्ष प्रवीण पारीख यांची प्रमुख उपस्थिती होती. यापूर्वी असीम अभ्यंकर हे अध्यक्ष होते. वर्षभर त्यांनी यशस्वीपणे काम केले. मॅन्युफॅक्चरिंग आणि मॅनेजमेंट स्टडीजमध्ये स्वप्निल यांचे प्रावीण्य आहे. ते सध्या लॉजिस्टिक आणि वेअर हाउसिंग क्षेत्रात सक्रियपणे काम करत आहेत. त्याचबरोबर पोलाद उत्पादन कंपनीचे कामही स्वप्निल पहातात.

बातम्या आणखी आहेत...