आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खा.डॉ.अमोल कोल्हे यांचा संकल्प:स्वराज्य संकल्पक शहाजीराजे स्मारक अन् गढी विकासासाठी पाठपुरावा करणार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेरूळ येथील स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले स्मारक व मालोजी राजे भोसले यांची गढीच्या विकासासाठी पाठपुरावा करतो. सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

गढीचे सुशोभीकरण व विकास काम प्रगती पथावर असून सदर ऐतिहासिक स्थळी भेट देऊन त्यांनी मार्गदर्शन करावे अशी विनंती स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले स्मारक सल्लागार समिती महाराष्ट्र शासनाचे सदस्य किशोर चव्हाण शिवप्रेमी राजेंद्र दाते पाटील, विजय काकडे पाटील यांनी केली होती.

त्यानुसार खासदार डॉ. कोल्हे यांना १८ डिसेंबर रोजी वेरूळ येथे गढीवर येऊन सर्वप्रथम शहाजीराजे यांच्या स्मारकाला अभिवादन केले. त्यानंतर संवाद साधताना ते म्हणाले की, राजेंच्या गढीवर येऊन मी भारावलो आहे. जागतिक स्तरावर स्मारकाचा समावेश होऊन परिसरात युवकांना मोठ्या प्रमाणावर पर्यटना च्या माध्यमातून मोठ्या संधी उपलब्ध होतील. या ठिकाणी असलेल्या तलावाचे आणि मालोजी राजे व विठोजी राजे भोसले यांच्या पाणी व्यवस्थापनेचा त्यांनी अधिक माहीती जाणुन घेण्याचा प्रयत्न केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले स्मारक सल्लागार समिती महाराष्ट्र शासनाचे सदस्य किशोर चव्हाण यांनी नमुद केले की,सध्या स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले स्मारकाची जागा सहा एकर असून अडीच एकर जागे मध्ये गढी असून साडेचार एकर जागेत स्मारकाचे काम सुरू असून भविष्यामध्ये स्मारकाच्या बाजूला तीन एकर आरोग्य विभागाला दिलेली जागा नव्याने या ऐतिहासिक स्मारकासाठी घेणार असून मालोजीराजे भोसले व विठोजीराजे भोसले यांनी बांधलेला 133 एकर मधील तलावालाही राज्य संरक्षित स्मारक व्हावे. म्हणून तत्कालीन सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केलेला आहे.

या तलावाच्या बाजूला पन्नास एकर जागेत शासनाच्या नगर रचना विभागाने बगीच्याचे नियोजन केलेले आहे त्याचाही समावेश स्मारकात भविष्यात करणार असून एकूण 192 एकर जागेमध्ये आराखडा तयार होत असून या 133 एकर तलावामध्ये आपण बाबाजीराजे भोसले यांचे कार्यकाळातील इतिहासाची सुरुवात करणार आहोत. तसेच शिवप्रेमींना व इतिहास प्रेमींना या स्मारका संदर्भात काही सूचना कराव्यात असे आवाहन देखील त्यांनी केले.

खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पुरातत्व विभागाकडे वेरूळ घृष्णेश्वर मंदिरा शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांच्या समाधी असून त्या समाधी विकासा साठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांशी संपर्क करावा तसेच या संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन करावे अशी विनंती केलेली आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवप्रेमी राजेंद्र दाते पाटील यांनी केले. महाराष्ट्र शासनाचे सदस्य डॉ प्रा त्रिंबक पाटील यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला डॉ.प्रा.त्रिंबक पाटील,छावा मराठा संघटन महाराष्ट्रचे प्रदेश अध्यक्ष विलास पांगारकर, विजय काकडे,डॉ कामाजी डक, सरपंच प्रकाश पाटील,परमेश्वर नलावडे, अशोक वाघ, राजेंद्र पवार, गणेश लोखंडे, सचिन सरकटे, विजय वाघमारे, अरुण पेरे, प्रदीप पाटील, प्रकाश मिसाळ,राजकुमार गाजरे, मच्छिंद्र घोरपडे, साहेबराव शेळके, सुरेश बोर्डे, नवनाथ घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...