आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उल्लेखनीय काम:रुक्मिणी सभागृहात 12 नोव्हेंबरला ‘स्वयं टॉक्स’ ; व्यक्तींचा अधिक प्रेरणादायी प्रवास

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा प्रेरणादायी प्रवास प्रभावी पद्धतीने सादर करणारा “स्वयं टॉक्स’ पुन्हा एकदा औरंगाबादेत हाेत आहे. १२ नोव्हेंबरला एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात हा कार्यक्रम संध्याकाळी ५.३० वाजता होईल, अशी माहिती संस्थापक नवीन काळे यांनी दिली.या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आशय महाजन तसेच मॅजिकचे संचालक आशिष गर्दे उपस्थित होते. काळे म्हणाले, पगारिया ऑटो मुख्य प्रायोजक आहेत, तर नवउद्योजकांना घडवणाऱ्या “मॅजिक’ संस्थेच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे.

महाजन म्हणाले, ‘प्रतिकूल टू कूल’ अशी या कार्यक्रमाची थीम आहे. यामध्ये महागडी परदेशी वैद्यकीय उपकरणे तयार करून वैद्यकीय खर्चात बचत करणारी गुरुशिष्यांची जोडी डॉ. रवींद्र महाजन आणि उमेश सोनार, प्लास्टिकपासून इंधन तयार करणारे उद्योजक डॉ. मेधा ताडपत्रीकर आणि शिरीष फडतरे, प्रवासी वाहतुकीत नावीन्यपूर्ण बदल घडवत व्यवसायात उंची गाठणारे प्रसन्न पटवर्धन आणि डॉ. गणेश हिंगमिरे भेटीला येतील. या सर्वांशी ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर संवाद साधतील. स्वयं टॉक्सच्या कार्यक्रमात पक्षिमित्र किरण पुरंदरे, एक एकर शेतीचे प्रणेते ज्ञानेश्वर बोडके, जयंती कठाळे, सियाचीनमध्ये ऑक्सिजन जनरेटर प्लँट उभारणाऱ्या सुमेधा चिथडे, अचानक दृष्टी गेल्यावरही न खचता पुन्हा भरारी घेणारी अनघा मोडक येऊन गेली आहेत.

डिजिटल अॅपवरही माहिती
“स्वयं’ डिजिटल अॅपही सुरू करण्यात आले आहे. “स्वयं टॉक्स’ या अॅपवर आजवरच्या सगळ्या वक्त्यांची भाषणे आणि मुलाखती तर आहेतच; शिवाय व्हिडिओज, पॉडकास्ट्स, ब्लॉग्जही आहेत.

बातम्या आणखी आहेत...