आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या आंब्याचा मोसम आहे. आंब्याच्या रसापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. आज आपण या गाेड, रसरशीत आंब्याच्या काही तिखट, चमचमीत पदार्थांच्या रेसिपी माहिती करून घेऊ.
मँगो सालसा
{ साहित्य : आंबा १, बारीक चिरलेला कांदा १ कप, चिरलेली हिरवी मिरची १, चिरलेली लाल ढोबळी मिरची १, कोथिंबीर बारीक चिरलेली २ चमचे, मिरपूड एक छोटा चमचा, जिरेपूड छोटा चमचा, तिखट १ चमचा, लिंबाचा रस २ छोटे चमचे, काळे मीठ चवीनुसार. { कृती : एक मोठा आंबा कापून बाऊलमध्ये ठेवा. त्यात कांदा, ढोबळी मिरची, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला. वरून मिरपूड, जिरेपूड आणि तिखट टाकून मिक्स करा. नंतर लिंबाचा रस आणि काळे मीठ टाका आणि जेवताना वाढा.
मँगो पुडिग { साहित्य : ब्राऊन ब्रेड ६ स्लाइस, बटर ५० ग्रॅम, कापलेले आंबे २, बासुंदी २ कप, व्हॅनिला इन्सेस १० ग्रॅम, विलायची पूड अर्धा चमचा, दालचिनी पूड अर्धा चिमूट, जायफळ पूड चिमूटभर, सजावटीसाठी पुदिना. { कृती : ब्रेडच्या चारही बाजूचे काठ कापा. ब्रेडच्या दोन्ही बाजूला बटर लावून घ्या. एका बाऊलमध्ये बासुंदी घ्या. त्यात व्हॅनिला इन्सेस, विलायची, दालचिनी आणि जायफळाची पूड टाका आणि मिक्स करून घ्या. नंतर बेकिंग पॅनला बटर लावा. पॅनमध्ये बासुंदी, कापलेला आंबा आणि ब्रेडचे तुकडे टाका. ३५-४० मिनिटे १७० डिग्रीवर ओव्हनमध्ये बेक करा. पूर्ण बेक झाल्यावर काही वेळ पुडिंग फ्रिजमध्ये ठेवा.
मँगो थाई करी
{ साहित्य : ग्रेव्हीसाठी साहित्य - थाई मिरची २, लसणाच्या ४ पाकळ्या, काश्मिरी लाल मिरची २, कांदा १, सोया सॉस एक छोटा चमचा, काफीर लिंबाची पाने ४, लेमन ग्रास स्टॉक ४, गरम मसाला २ छोटे चमचे, पाणी १ मोठा चमचा, जिरे १ चमचा, मीन चवीनुसार { थाई करीसाठी साहित्य : नारळाचे तेल ३ छोटे चमचे, नारळाचे दूध २ कप, आंब्याचा गर १ कप, मटर १ कप, पनीर कापलेला १ कप, पाणी २ कप, कापलेले गाजर १ कप, चिरलेली लाल ढोबळी मिरची १, ब्रोकली कापलेली १ कप, बेबी कॉर्न १ कप, तुळशीच्या पानांची पूड १ छोटा चमचा (टीप : थाई करीसाठी इतर प्रोटिन्सयुक्त भाज्यांचाही उपयोग केला जाऊ शकतो.) { साहित्य : ग्रेव्हीसाठीचे साहित्याची मिक्सरमधून पेस्ट करून घ्या. कढईत नारळाचे तेल आणि पेस्ट घाला आणि मंद आचेवर तीन -चार मिनिटे तेलात भाजा. नंतर सर्व भाज्या त्या पेस्टमध्ये घाला. मंच आचेवर शिजू द्या. नंतर त्यात नारळाचे दूध आणि पाणी घाला. मंच आचेवर शिजू द्या. भाजी शिजल्यावर त्यात आंब्याचा गर घाला. मीठ घालून दोन-तीन मिनिटांनी गॅस बंद करा. वरून तुळशीच्या पानांची पूड टाकून भातासोबत वाढा.
आंबा- मिरची पराठा
{ साहित्य : आंबे (तोतापरी किंवा कमी गर असलेले कोणतेही) ४, छोटा चमचा मीठ, लाल मिरचीचे लोणचे १ छोटा चमचा, गव्हाचे पीठ १ वाटी, तूप आणि पाणी गरजेनुसार. { कृती : आंब्याला किसून घ्या. त्यात लाल मिरचीचे लोणचे आणि मीठ घाला. नंतर त्यात गव्हाचे पीठ घालून चांगले मळून घ्या. पीठ मळताना पीठ कोरडे वाटल्यास त्यात थोडे पाणी घालून मळा. मळलेल्या पिठाला थोडे तूप लावा. आता मळलेल्या पिठाचे गोळे करून पोळी लाटा. नंतर तव्यावर मंद आचेवर भाजा. भाजताना पराठ्याला तूप लावा. दही आणि चटणीसोबत गरमागरम पराठे खायला द्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.