आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिसंवाद:‘वैद्यकीय व्यवसायातील नैतिक आणि कायदेशीर बाबीं’वर  परिसंवाद

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय तसेच असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया (महाराष्ट्र) यांच्या संयुक्त विद्यमाने ३ सप्टेंबर २०२२ रोजी ‘वैद्यकीय व्यवसायातील नैतिक आणि कायदेशीर बाबी’ विषयवार परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

यात राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय स्तरावरील कायदेतज्ञ आणि डॉक्टरांचा सहभाग असणार आहे. या परिसंवादाचे उद‌्घाटन नवी दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या. आर. के. अग्रवाल यांच्या हस्ते होईल आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जि. सिद्धेश असतील. यावेळी न्या.एस. पी. तावडे, राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य डॉ.एस. एम. कांतीकर, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, असोशिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहील. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या. आर. के. अग्रवाल हे ‘वैद्यकीय निष्काळजीपणा आणि ग्राहक संरक्षण अधिनियम 2019’ या विषयावर मार्गदर्शन करतील. त्यानंतर ‘ वैद्यकीय निष्काळजीपणा कसा टाळावा’ या विषयावर राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य डॉ.एस. एम. कांतीकर विचार मांडतील. त्यांनतर ज्येष्ठ वैद्यकीय-कायदेविषयक सल्लागार अॅड. डॉ. गोपीनाथ एन.शेनॉय हे ‘वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरण निश्चितीसाठी पाळावी लागणारी सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेली 11 मार्गदर्शक तत्वे’ या विषयावर मार्गदर्शन करतील.

बातम्या आणखी आहेत...