आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील जीतो संस्थेने ताज हॉटेल येथे ४ व ५ मार्च रोजी आयोजित केलेल्या चर्चासत्र व परिसंवादात पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, नागपूर, अहमदनगर, पिंपरी चिंचवड, इचलकरंजी, मालेगाव येथून १५० हून अधिक उत्पादक उद्योजक सहभागी झाले होते. यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मार्गदर्शन केले.जीतोचे आंतरराष्ट्रीय चेअरमन अभय श्रीमाल, पाणिनी अॅडव्हायझरचे सीईओ केतन शाह, अॅक्रोबोटिक्सचे सीईओ आशिष सुराणा, रिलायन्सचे उपाध्यक्ष किशोर डोणगावकर, पवन ग्रुपचे सीईओ शिवप्रसाद जाजू यांचे ‘उत्पादन उद्योजकासाठी येणाऱ्या संधी व आजच्या व्यवसायात ऑटोमायझेशनची गरज’ यावर व्याख्यान झाले. जीतोचे चेअरमन पारस ओस्तवाल, सचिव दिनेश मुथा, कार्यक्रमाचे संयोजक रजनीश कटारिया, दर्शन संचेती यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वितेसाठी जीतोचे संस्थापक अध्यक्ष पुखराज पगारिया, जीतो महाराष्ट्राचे व्हाइस चेअरमन रवी खिंवसरा, निखिल खिंवसरा, आशिष पोखरणा, अमित खाबिया, सुहास कोटेचा, आनंद मिश्रीकोटकर, निशिकांत जैन, सावन चुडीवाल, किरण सांकला, पंकज पांडे, जेबीन मिलापचे मुख्य संयोजक चेतन जैन, जीतो यूथ विंग अध्यक्ष सुरक्षा कटारिया, सचिव मिहिर बंब, रौनक कांकरिया, ईशा ओस्तवाल, निपुण जैन आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.