आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसीस बाबत लक्षणे समजावऊन सांगणे आवश्‍यक- देवेंद्र फडणवीस

हिंगोली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ओबीसी आरक्षणाबाबत राज्याने पंधरा महिने झोपा काढल्या

राज्यात कोविड आजारामध्ये रेमडेसीविर इंजेक्शन दिलेल्या तसेच कोविडमुक्त झालेल्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना म्युकरमायकोसीस आजाराच्या लक्षणांबाबत माहिती देणे आवश्‍यक असल्याचे मत माजी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी(ता. ३) पत्रकार परिषदेत सांगितले.

हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेते माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड. शिवाजी जाधव, आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, माजी आमदार रामराव वडकुते, नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांची उपस्थिती होती.

यावेळी फडणवीस म्हणाले की, राज्यात म्युकर मायोकोसीसचे आता पर्यंत ५००० रुग्ण आढळून आले आहेत. या आजारामध्ये रुग्णांना शरीराचा अवयव गमवावा लागत आहे. त्यामुळे लक्षणे दिसल्यानंतर तातडीने उपचार मिळणे आवश्‍यक आहे. त्यासाठी कोविडमध्ये उपचार घेतांना रेमडेसिवीर व इतर इंजेक्शन घेऊन कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना लक्षणे समजाऊन सांगणे आवश्‍यक आहे. तसेच त्या आजाराची इंजेक्शन शासनाने शासकिय व खाजगी रुग्णालयात मोफत द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

राज्यात कोरोनाची संभाव्य तिसरीलाट लक्षात घेता आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याने शहराच्या दर्जा प्रमाणे कोविड उपचाराचे शुल्क आकारण्याचे पत्रक काढले मात्र त्यासाठी उशीर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर पीएम केअर मधील व्हेंटीलेटर काही ठिकाणी सहा महिन्यापेक्षा अधिक काळ उघडलेच गेले नसल्याने काही तांत्रीक दोष निर्माण झाले असतील असे सांगत त्यांनी या व्हेेंटीलेटरच्या वादावर पडदा टाकला.

हिंगोली जिल्हयाने कोविडमध्ये केलेले काम उत्तम असल्याचे सांगत त्यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. तिसऱ्या लाटेच्या नियोजनाचीही त्यांनी यावेळी माहिती घेतल्याचे सांगितले.

तर देशाच्या ग्रामविकासात वेगळे चित्र उमटवले असते

लोकनेते गोपिनाथ मुंडे हे आमच्यात नाहीत यावर अद्यापही आमचा विश्‍वास नाही. राज्याचे गृहमंत्री असतांना त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली. त्यानंतर केंद्रात ग्रामविकास मंत्री असतांना त्यांना अधिक काळ काम करण्याची संधी मिळाली नाही. मात्र आज गोपिनाथ मंुंडे असते तर देशाच्या ग्र्रामविकासात त्यांनी वेगळे चित्र उमटवले असते.

ओबीसी आरक्षणाबाबत राज्याने पंधरा महिने झोपा काढल्या

ओबीसी आरक्षणासाठी राज्यातील मंत्री एकीकडे आंदोलन करीत असतांना दुसरीकडे न्यायालयात बाजू मांडण्यासाठी त्यांच्यातून कोणीही हजर झाले नाही. पंधरा महिने शासनाने झोपा काढल्या काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ओबीसींना राजकिय आरक्षण देण्यासाठी भाजपा तिव्र आंदोलन करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...