आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट:सिग्नलचे होणार सिंक्रोनायझेशन; दुरुस्तीचे काम मनपा घेणार हाती

छत्रपती संभाजीनगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जी- २० परिषदेमुळे शहरातील अनेक रस्ते चांगले झाले आहेत. मात्र अनेक ठिकाणच्या सिग्नलमध्ये बिघाड झाला आहे. काही चौकातील सिग्नल १६० सेकंद असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने ६२ टक्के सिग्नलचे टायमिंग बंद या मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते. सिग्नल दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू केले येईल, अशी माहिती मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुख्य रस्त्यांवरील चौकात ५३ सिग्नल बसवले आहेत. मात्र, त्यापैकी १० सिग्नल पूर्ण बंद आहेत. ४३ सिग्नल सुरू आहेत. ३३ सिग्नलचे टायमिंग सुरू नाही. म्हणजेच शहरातील ६२ टक्के सिग्नल टायमरविना सुरू आहेत. नेमकी वेळ कळत नसल्याने सिग्नल सुटेपर्यंत एक ते दोन मिनिटे वाहने सुरूच ठेवावी लागतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते, असे निदर्शनास आले होते.

जालना रोडवरील सेव्हन हिल्स, बाबा पेट्रोल पंप चौकातील लाल, हिरव्या सिग्नलच्या टायमिंगमध्ये बरीच तफावत आहे. टीव्ही सेंटर, जिल्हाधिकारी कार्यालय, हर्सूल येथील सिग्नलमध्येही दुरुस्तीची आवश्यकता आहे. एक सिग्नल ११० सेकंद, तर दुसरे सिग्नल १९८ सेकंद व लगेच १०० सेकंद असे चुकीचे टायमिंग दाखवते. आकाशवाणी व दूध डेअरी चौक बंद केल्याने सिडको ते बाबा अशी दुतर्फा वाहतूक सुरू आहे. असे असताना अचानक सिग्नल लागतो. त्यामुळे वाहनधारकांना नेमके थांबावे की जावे हे कळत नाही. स्मार्ट सिटीकडून मुंबईच्या धर्तीवर जालना रोड, जळगाव रोड, बीड बायपास, व्हीआयपी रोडवरील ३१ ठिकाणी एलईडी स्मार्ट सिग्नल बसवले आहेत. पण त्याचे टायमिंग चुकीचे आहे.

बातम्या आणखी आहेत...