आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 क्रिकेट स्पर्धा उत्साहात:व्हिजन संघ विजयी, अजय काळे ठरला सामनावीर पुरस्कारचा मानकरी

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रुपीट मैदानावर सुरू असलेल्या 25 वर्षांखालील गुलाबी चेंडूवरील टी-20 क्रिकेट स्पर्धेत अजय काळेच्या अर्धशतकाच्या जोरावर व्हिजन क्रिकेट संघाने शानदार विजय मिळवला. व्हिजनने एमई अकादमीवर 9 गड्यांनी मात केली. अजय काळे सामनावीर पुरस्कारचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एमई अकादमीने 20 षटकांत 9 बाद 121 धावा उभारल्या. संघाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर संकेत पगारे 5 धावांवर परतला. तेजस काजळेने 13 धावा केल्या. आरेफ पटेल 6 धावांवर बाद झाला. पवन थोरेने 12, मुक्ता मगरेने 12, ओंकार बिरोटेने 13 धावा काढल्या.

जंगलेच्या सर्वाधिक 33 धावा

तळातील फलंदाज प्रद्युम्न जंगलेने सर्वाधिक 33 धावा केल्या. या खेळी त्याने २१ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार मारले. प्रज्वल अंधारेने 10 धावा जोडल्या. व्हिजनच्या भुषण नावंदेने 15 धावांत 3 बळी घेतले. धीरज थोरात, शुभम लकुलकर व अनिल थोरेने प्रत्येकी 1-1 गडी बाद केला.

व्हिजनने 1 गडी गमावत गाठले लक्ष्य

प्रत्युत्तरात व्हिजन संघाने अवघ्या 8.3 षटकांम 1 गडी गमावत विजय साकारला. यात सलामीवीर प्रतिक बोधगिरेने 12 चेंडूत 4 चौकारांसह 22 धावा केल्या. अष्टपैलू धीरज थोरातने 15 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचत 34 धावा केल्या. प्रतिक व धीरज जोडीने 32 धावांची भागीदारी केली. त्यानंतर आलेल्या अनुभवी अजय काळेने अर्धशतकी खेळी करत संघाला विजयी केले. त्याने 24 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 4 षटकार लगावत 59 धावांची खेळी केली. एमई अकादमीकडून एकमेव बळी प्रज्वल अंधारेने घेतला. त्याने 3 षटकांत 42 धावा काढल्या.

बातम्या आणखी आहेत...