आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाची निवडणूक जाहीर:महाराष्ट्रातून साळुंके, पठारे यांना मतदानाचा अधिकार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय महासंघाची निवडणूक शनिवारी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातून तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई ( ताम) या अधिकृत संघटनेचे अध्यक्ष प्रवीण साळुंके व महासचिव मिलिंद पठारे यांना निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. सांळुके व पठारे यांची संघटना महाराष्ट्रातील अधिकृत राज्य संघटना ठरली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये तायक्वांदो खेळात दोन फेडरेशन व महाराष्ट्रातही दोन संघटना तयार झाल्या होत्या. 28 एप्रिल 2022 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया हीच अधिकृत राष्ट्रीय संघटना असल्याचे जाहीर करून निवडणूका घेण्याचे आदेश दिले होते. नवी दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयानुसार तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवडणुकीसाठी अधिकृत मतदार राज्य संघटना निश्चित करण्याचे काम गेल्या चार महिन्यांपासून ऑलिंपिक भवन, नवी दिल्ली येथे नवी दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश सस्तानी यांच्या समोर सुरू होते. आज शुक्रवार दिनांक 28 ऑक्टोबर 2022 रोजी निवडनुक कार्यक्रम जाहीर झाला असून तायक्वांदो कोणत्या फेडरेशन ऑफ इंडियाची मतदार यादी ही जाहीर झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील संघटना, पदाधिकारी व सर्व खेळाडूंमध्ये एकच आनंद व जल्लोष साजरा केला जात आहे

बातम्या आणखी आहेत...