आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तायक्वांदो स्पर्धा:कृष्णा, युवराज, श्रुती, अनुष्काला सुवर्णपदक

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा तायक्वांदो संघटनेतर्फे विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत विविध गटात कृष्णा अदहत, रणवीर चव्हाण, अद्वैत पारपेल्ली, श्रृती दिपके, सोनल बोर्डे, अनुष्का जैन, आर्या रोटे, किंजल सोनवणे, तनिष्का शर्मा आणि चेतना वर्मा यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.स्पर्धेत १५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. विजेत्या खेळाडूंना भाजपचे शहर जिल्हा सचिव शंतनू उऱ्हेकर यांच्या हस्ते पदक आणि प्रमाणपत्र बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रा. प्रसाद कुलकर्णी, प्रा. भरत सलामपुरे, सचिंदर रॉय, श्रीपाद देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.स्पर्धा यशस्वितेसाठी विजय शिंगारे, ऋषिकेश अपोनारायण, नयन तिवारी, तांत्रिक प्रमुख मोहित देशपांडे, रूपेश शिंदे, संकेत व्यवहारे, संकेत कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.

विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे शंभुराज चव्हाण, सत्यम कोपकवाड, दक्ष जाधव, कृष्णा अडहत, स्वराज लटपटे, राघवेंद्र जगताप, रोहित सुतार, वेदांत शेटे, आयुष निसर्गंध, रणवीर चव्हाण, युवराज शेळुकर, अनुष्का जैन, फझल रोलिम खान, आयुष शिरसाठ, सुमीत ढोने, ऋषिकेश क्षीरसागर, अमित नाईक, चैतन्य साळुंके, साई काटकडे, प्रथमेश केवडे, पवनकुमार सोनवणे, अदिश रोटे, हर्षवर्धन गायकवाड, तनिष्का शर्मा, मेघा बन्साळी, श्रेया गंधे, भक्ती धूत, सरस्वती रोंगे, तन्वी पागोरे, मिथाली चव्हाण, आर्या रोटे, किंजल सोनवणे, चेतना वर्मा .

बातम्या आणखी आहेत...