आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई करा:नशेच्या गोळ्यांचा धंदा करणाऱ्यांवर कारवाई करा; खा. इम्तियाज यांची पोलिस आयुक्तांकडे मागणी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे, अल्पवयीन मुलांना व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी नशेच्या गोळ्यांची विक्री, खरेदी करणारे व त्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी विशेष पथक स्थापन करावे, अशी मागणी खा. इम्तियाज जलील यांनी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्याकडे केली आहे. शहरातील अनेक अल्पवयीन मुले व तरुण नशेच्या आहारी गेल्याने मागील काही दिवसांपासून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत. या सर्व घटनांमागे नशेखोर असल्याचे आढळले आहे. नशेखोरांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

विविध गल्ल्यांतील औषध विक्रेत्यांकडून बटण, ऑरेंज आणि किटकॅटच्या नावाखाली झोपेच्या गोळ्यांचा डोस देण्याचे उद्योग सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पोलिसांनी कठाेर पाऊल उचलावे, अशी मागणी खा. इम्तियाज यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...