आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शारदा मंदिरच्या मुख्याध्यापिका डॉ. मुळेंनी बजावले:विद्यार्थिनींची काळजी घ्या, अन्यथा वाहनास बंदी घालू

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिक्षाचालकाकडून शालेय विद्यार्थिनींशी झालेल्या गैरवर्तनाच्या पार्श्वभूमीवर शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका डॉ. सविता मुळे यांनी वाहन समितीची तातडीची बैठक घेतली. “आपली मुलगी समजून विद्यार्थिनींच्या सुरक्षेची काळजी घ्या आणि अपप्रवृत्तींविरोधात वडिलकीच्या नात्याने जागरूक राहा. शालेय रिक्षांमध्ये अन्य कुणाला बसवू नका, नियमांचे पालन करा, अन्यथा तुमच्या वाहनास शाळा परिसरात बंदी करण्यात येईल,’ अशी सक्त ताकीदही डॉ. मुळे यांनी दिली.

शालेय विद्यार्थिनींशी व्हॅनचालकाचा मित्र असलेल्या रिक्षाचालकाने केलेल्या गैरवर्तनाचे पडसाद शहरात उमटले. या पार्श्वभूमीवर शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या वाहन समितीची बैठक झाली. विद्यार्थिनींच्या सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी सर्वांची असल्याचा सूर या बैठकीत उमटला. शाळेच्या परिसरात कुणी अनोळखी व्यक्ती असल्याचे वाटल्यास त्याची माहिती त्वरित शाळेला द्यावी, असे आवाहन करण्यात आले. शालेय रिक्षांच्या चालकांचा गणवेश, परवाने व वर्तनाबाबतच्या नियमांची चर्चा करण्यात आली. लवकरच पालकांचीही बैठक घेण्यात येईल. वाहन समितीची बैठक नियमित घेऊन आम्ही विद्यार्थिनींच्या सुरक्षेची काळजी घेत असल्याचेही डॉ. मुळे यांनी सांगितले. (शाळेचे गेट ते घर या वाटेवर आपली मुले सुरक्षित आहेत का?... वाचा स्पेशल रिपोर्ट

बातम्या आणखी आहेत...