आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्येत सांभाळा:उष्माघातापासून घ्या स्वतःची अन् कुटुंबाची काळजी, वैद्यकीय तज्ज्ञांनी दिल्या टिप्स, तुमचा असह्य उन्हाळा करा सुसह्य

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

आला आला उन्हाळा तब्येत तुमची सांभाळा, अशी म्हण सर्वश्रूत आहे. यंदाचा उन्हाळा खूप तीव्र होताना जाणवत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. अशातच आपण उष्माघात आणि वाढत्या उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

उन्हाळ्यात काही आजार होण्याचा संभव असतो. या आजारापासून स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांनी काही टीप्स दिल्या आहेत. त्यांनी 'दिव्य मराठी'शी बातचित केली.

डॉ. श्रुती राजपूत यांनी सांगितले की, उष्णता वाढली की, अनेक आजारही डोके वर काढतात. अशक्तपणामुळे कार्यक्षमता कमी होते आणि निरुत्साह सुद्धा जाणवतो. अशा काळात तब्येतीची काळजी घेणे खूपच गरजेचे असते.

उन्हाळ्यात होऊ शकतात हे आजार

उन्हाळ्यात उष्माघात, जंतुसंसर्ग, डायरिया, कावीळ, टायफॉईड, लहान मुलांमधील जंतुसंसर्ग, गोवर, कांजण्या, गलगंड, डोळ्यांचे आजार, त्वचेचे आजार, मुतखडा, लघवी मार्गाचा जंतुसंसर्ग इत्यादी समस्यांचा समावेश आहे.

उष्माघात टाळण्याठी काय कराल?

शरीरातील पाणी कमी झाल्यास चक्कर येते. अशावेळी रुग्णाला थंड वातावरणात शांत झोपवावे, शरीर थंड पाण्याने पुसून घ्यावे. डोक्यावर बर्फाची पिशवी ठेवावी. उष्माघाताचा त्रास होत असलेल्या रुग्णाला जास्तीत-जास्त द्रव आहार द्यावा, लिंबू सरबत घ्यावे, ताप आला तर डॉक्टरांना दाखवावे, स्वः उपचार कटाक्षाने टाळावेत.

कशी घ्याल स्वतःची काळजी?

 • उन्हाळ्यात शक्यतो पचायला हलका व कमी आहार घ्यावा. यात वरण-भात तसेच पालेभाज्यांचे प्रमाण आहारात वाढवावे.
 • टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी, काकडी, द्राक्षे आदी फळांचे सेवन वाढवावे.
 • थंड तुपाचाही आहारात समावेश करावा.
 • नारळ पाणी, ऊसाचा रस, कोकम सरबत, नीरा तसेच फळांचा ताजा रस घ्यावा, जेवणानंतर ताकही घ्यावे.
 • जास्त मांसाहार टाळावा. भरपूर पाणी प्यावे.
 • दही ताक शक्यतो दररोज नक्की सेवन करावे.
 • काळे वस्र उष्णतेचे सुवाहक़ असल्याने परिधान करणे टाळून स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करावे.
 • दुपारी 12 ते 4 या वेळे मध्ये उन्हात जाणे टाळावे.
 • तेलकट पदार्थ अत्यल्प प्रमाणात घ्यावे.
 • धावणे आणि दम लागेल असे खेळ खेळणे टाळावे.​​​​​​
बातम्या आणखी आहेत...