आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद खंडपीठाचे तहसीलदारांना आदेश:जय भवानी कला केंद्राच्या परवाना नूतनीकरणासंबंधी नव्याने निर्णय घ्या

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गंगाखेड तालुक्यातील शिवाजीनगर येथील जय भवानी लोकनाट्य कला केंद्रचा परवाना नूतनीकरणासंदर्भात गंगाखेडच्या तहसीलदाराने नव्याने निर्णय घ्यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती किशोर संत यांनी दिले.याचिकाकर्ते दिलीप खंडेराव अंधारे यांच्या मृत पत्नीच्या नावे कला केंद्राचा परवाना होता. पत्नीच्या निधनानंतर संबंधित परवाना आपल्या नावावर हस्तांतरित करावा यासाठी गंगाखेड तहसीलदारांकडे त्यांचा अर्ज प्रलंबित होता.

गंगाखेड तहसीलदारांनी ३१ डिसेंबर २०१८ ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत परवान्याचे नूतनीकरण केले होते. असे असताना तक्रारीचा आधार घेत तहसीलदारांनी २० जानेवारी २०२० रोजी कला केंद्राचा परवाना रद्द केला. त्याविरोधात औरंगाबाद खंडपीठात अॅड. विठ्ठल चाटे यांच्यामार्फत अर्जदारांनी याचिका दाखल केली. याचिकेत गंगाखेड पोलिस स्टेशनच्या अहवालानुसार अचानक भेटी दिल्या असता, कला केंद्रात कुठलाच गैरप्रकार आढळला नसल्याचे स्पष्ट केले होते. खंडपीठाने तहसीलदारांचा आदेश रद्द करून परवाना नूतनीकरणसंदर्भात नव्याने निर्णय घ्यावा, असे आदेश दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...