आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Take Immediate Action Against The Corrupt And Corruption related Officials In The Municipality, Otherwise AAP Warns The Administration Of Protesting On 5 December

'आप'चा प्रशासनाला इशारा:मनपातील भ्रष्ट व भ्रष्टाचार संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करा, अन्यथा 5 डिसेंबरला आंदोलन

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाच्या नियमानुसार भ्रष्ट व भ्रष्टाचाराच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात त्यांना पाठीशी घातले जात आहे. या चुकीच्या धोरणांमुळे भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे मनपा प्रशासनाने त्वरीत कारवाई करावी, अन्यथा 5 डिसेंबर रोजी आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.

जिल्हाध्यक्ष तथा शहर कार्याध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टी च्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन दिले. ते सहाय्यक आयुक्त निकम यांनी स्वीकारले.

शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी भ्रष्ट व भ्रष्टाचार संबंधी बाबींमध्ये अडकलेल्या अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी. अन्यथा आम आदमी पार्टी यासाठी मोठे आंदोलन उभे करेल, सविस्तर निवेदनाद्वारे असे सांगितले की असे निदर्शनास आले आहे की संदर्भिय शासन परिपत्रक नुसार कार्यवाही करावी असे आशयाचे निवेदन आम आदमी पार्टीच्या वतीने एक वर्षापूर्वी दिले होते, परंतु आपल्या कार्यालयाच्या वतीने भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणे व या कामास टाळटाळ केली जात आहे. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे सामान्य नागरिकांना अडचणी सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर शासनाच्या स्वच्छ व पारदर्शक कारभाराच्या प्रतिमेस देखील धक्का पोहोचत आहे.

ज्या अधिकार्‍यांविरुद्ध सापळा प्रकरणी कारवाई झाली आहे. अपसंपदेच्या प्रकरणात ज्या अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ज्या अधिकाऱयांचे चारित्र्य संशयास्पद आहे. ज्यांचेवर गुन्हे दाखल झालेले किंवा विविक्षीत प्रकरणात चौकशी सुरू असलेले अधिकारी आणि कर्मचारी असे विभागप्रमुखांच्या लक्षात आले आहे अशांची नावे संशायास्पद सचोटी असलेल्या यादीत समाविष्ठ करावी.

सदर यादीचा वापर पदोन्नती, महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती, पारपत्र देणे, केंद्रीय नियुक्ती, परदेश प्रशिक्षण, विविध प्रकारचे मेडल्स व गुणगौरव पुरस्कार देतांना करण्यात यावा. असे स्पष्ट आदेश दिलेले असताना आपल्या अधिनस्त कार्यालयात या परिपत्रकानुसार कार्यवाही करण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून येते. इत्यादी बाबी अशा सविस्तरपणे मांडल्या व ज्या विभागप्रमुखांनी सूचनांचे काटेकोर पालन केले नाही त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा नियम (वर्तणूक) यानुसार कठोर कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा 5 डिसेंबर रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी आम आदमी पार्टी औरंगाबाद जिल्ह्याचे बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते त्यात प्रामुख्याने जिल्हा सचिव संजय नागरे, बशीर , प्रवीण हिवाळे, लोडिंग रिक्षा शहर अध्यक्ष ख्वाजा किस्मतवाला पाशा खान, उबेद इनामदार, देविदास लहाने, डॉ भास्कर रेगे, नासिर खातिब, अंकुश आगे, शरीख ख्वाजा, शेख बाबू, सतीश दूनघव, विकास काळे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...