आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक कोंडी करणाऱ्यांना सूचना:तुमची गाडी बाजूला घ्या, आता भररस्त्यावर होणार पुकारा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मनमानी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिस कर्मचारी कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये बसून ७०० सीसीटीव्हीच्या माध्यमातून बेशिस्त वाहने ट्रॅक करणार आहे. तसेच स्मार्ट सिटी आयस्‍कोप प्रकल्पांतर्गत ‘पब्लिक ॲड्रेस सिस्टिम’ विकसित केली आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारी तुमची गाडी बाजूला घ्या, असा संदेश ४५० लाऊडस्पीकरद्वारे दिला जाणार आहे. याचबरोबर आपत्कालीन परिस्थिती, हवामान अंदाज, प्रदूषण यासह महत्त्वाच्या सूचनाही दिल्या जाणार आहेत. मंगळवारी त्याची पैठण गेट येथे चाचणी घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली.

मुख्य चौक, रस्त्यांवर पोलिस कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वॉच ठेवत आहेत. कॅमेऱ्यांचे कंट्रोल पोलिस आयुक्त कार्यालय व स्मार्ट सिटी अभियानाच्या कार्यालयातून होते. त्यासाठी कंट्रोल रूम तयार केल्या आहेत. यासंदर्भात प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान यांनी सांगितले की, शहरातील ४०० चौकांत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या खांबांवर ४५० स्पीकर बसवले आहेत. त्यामुळे पोलिसांना वाहतुकीला शिस्त लावण्यासोबतच कायदा व सुव्यवस्था, आपत्कालीन व्यवस्थापनासंदर्भातील सूचना तातडीने पोहोचवणे सोपे झाले आहे.

मंगळवारी स्मार्ट सिटीमार्फत इंटिग्रेटेड ऑपरेशन कमांड आणि कंट्रोल सेंटरमध्ये डेमो देण्यात आला. अधिकाऱ्यांनी पैठण गेट चौकातील स्पीकरवरून रस्त्यावर बेशिस्त लावलेल्या गाड्यांच्या क्रमांकाचा पुकारा केला. ही वाहने तातडीने बाजूला घ्या, अशी सूचना केली. त्यानंतर हा आवाज कुठून येतोय, अशा भांबावलेल्या अवस्थेत वाहनचालकाने तातडीने वाहने बाजूला केली.

स्पीकरवरुन चौकातील ५० मीटरच्या परिसरावर कंट्रोल स्पीकरवरून चौकातील ५० मीटरच्या परिसरावर कंट्रोल करता येणार आहे. सूचनांसोबतच संबंधित चौकातील नागरिकांचा आवाजदेखील पोलिसांना ऐकायला येईल. त्यामुळे एखाद्या चौकात काही गडबड झाल्यास पोलिसांना स्पीकरच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे, असे इम्रान खान यांनी नमूद केले.

बातम्या आणखी आहेत...