आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुला खूप उशीर झाला आहे’, ‘आम्ही प्रयत्न करू, बाकी सर्व देवाच्या हातात आहे’ ‘आम्हाला त्रास देऊ नका, काम करू देणार की नाही, जा आणि बाहेर बस.’ अशा शब्दांची यादी न संपणारी आहे. अशा शब्दांची सरबत्ती तुम्ही हॉस्पिटलमध्ये किंवा चित्रपटात दर्शवण्यात येणाऱ्या हॉस्पिटलच्या प्रसंगामध्ये. असे नाही की डॉक्टरांकडे काळीज नसते. देशात चार हजार व्यक्तींमागे एक डॉक्टर आहे, आणि प्रत्येकाला असेच वाटते की, त्यांनी आधी आपला रुग्ण पाहावा. अशा दबावात काम करणाऱ्या त्या डॉक्टरांना मी सलाम करतो. परंतु, अलीकडच्या काळात असे दृश्य पोलिस ठाण्यात पाहायला मिळते आहे. कारण सध्या सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे उदाहरण पाहा. मागील महिन्यात दोघांनी एका अॅपवर आपण ट्रॅव्हल एजंट असल्याचे भासवत बनावट नंबरने रजिस्ट्रेशन करत दिल्लीतील एका प्रोफेसरला भरपूर डिस्काउंटची ऑफर देत त्यांचे विमान तिकीट बुक केले, तिकिटे व्हॉट्सअॅप केली, नंतर तिकीट कॅन्सल करून त्याचे दीड लाख रुपयांचे रिफंडही घेतले आणि फोन बंद करून टाकला. बंगळुरूच्या दोघा आयटी इंजिनिअर्सनीही अशा प्रकारे सहा लाख रुपये गमावले. मागील महिन्यात रवी सिंह यांनी लखनऊ-मुंबई तिकिटाचे ५६०० रुपये तर अखिलकुमार हेदेखील हैदराबाद-विजयवाडा तिकिटात फसले. थांबा, केवळ ट्रॅव्हल इंडस्ट्रीतच असे होते असे नाही. असे प्रकार वेगाने वाढत आहेत. सायबर गुन्ह्यांनी जनसामान्यांच्या आयुष्यालाही ग्रहण लावले आहे. तुम्ही ‘consumercomplaintscourt.com’ या वेबसाइटवर जाल, तर तुम्हाला दिसेल की, देशभरात कशा प्रकारे ऑनलाइन फसवणूक होत आहे. यासाठी पोलिस, सायबर फसवणुकीतील गुन्ह्यांना सध्या प्राधान्याने हाताळत आहेत, जसे डॉक्टर सर्वाधिक गंभीर रुग्णाला उपचारासाठी प्रथम प्राधान्य देतात, अगदी तसेच. मला याचा अंदाज तेव्हा आला जेव्हा मला सायबर सेलकडून एकामागून एक असे मेसेज येऊ लागले की, ‘तुम्हाला तुमची वीज कापली जाईल, असा मेसेज आला आहे का? बँक खाते ब्लॉक होण्याचा मेसेज आला आहे का? हे फ्रॉड मेसेज असू शकतात, सावध व सतर्क राहा, कोणताही नंबर वा लिंकवर क्लिक करू नका. -प्रेषक महाराष्ट्र सायबर.’ मागील दोन महिन्यांत महाराष्ट्र सायबर विभागाने वीज बिले आणि प्रलंबित केवायसीच्या बहाण्याने होणाऱ्या फसवणुकीसंदर्भात संपूर्ण राज्यात दोन कोटींपेक्षा अधिक मेसेज पाठवले आहेत. सायबर सुरक्षा व सायबर गुन्हेगारी तपासासाठी नोडल एजन्सी-महाराष्ट्र सायबरने बल्क मेसेजिंग सुविधांचा दुरुपयोग करणाऱ्या ऑनलाइन फसव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जियो, एअरटेल, व्होडाफोनसारख्या दूरसंचार कंपन्यांसोबत करार केले आहेत. काल याच चर्चेसाठी मी माझ्या एका पोलिस मित्राकडे गेलो होतो. त्याचे पोलिस स्टेशन माझ्या घरापासून २० किलोमीटरवर आहे, परंतु पावसाचा व्यत्यय नसल्याने मी लवकरच पोहोचलो. ठेकेदारांकडून देखरेखीविना कचरा तसाच टाकल्याने ही समस्या मुंबईत वर्षानुवर्षे आहे. या वर्षी पालिकेने यातून सुटका मिळवण्यासाठी एसएमएसचा पर्याय निवडला. त्यांनी मेसेज केला की, ‘तुम्ही तुमच्या घराची दुरुस्ती केली आहे का? त्यातून काही मोडतोडीचे साहित्य एकत्र पडले आहे का? आम्ही ३३१ रुपये मेट्रिक टनाने एका फोनवर हा कचरा तुमच्या जागेवरून घेऊन जाऊ. जर अनधिकृत माणसाला दिले तर तुम्हाला २० हजार रुपयांचा दंड पडेल.’
फंडा असा की, जर तुम्ही कामाच्या तणावाखाली स्वत:ला गाडून घेऊ इच्छित नसाल तर आधीच आगाऊ पावले उचला. संबंधित व्यक्तीला सतर्क करा आणि आपला फोन नंबर द्या, यामुळे ती तक्रार त्या त्या स्तरावर निरसन होईल आणि तुमचे ओझेही कमी होईल.
एन. रघुरामन raghu@dbcorp.in
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.