आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातलवार टायटन्स संघाने पाचव्या ज्युडिशियल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत फायनलमध्ये टायटन्सने जल्लोष हिवाळे-मुळे संघावर ६ गडी राखून मात केली. या लढतीत सुनील भोसले (१ बळी, ५० धावा) सामनावीर मानकरी ठरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुळे संघाने १० षटकांत ४ बाद ७६ धावा उभारल्या. सलामीवीर सय्यद उस्मान १० चेंडूंत १ चौकार खेचत ९ धावांवर परतला. अभिजित विटोरे ८ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या प्रशांत आवरेने एकाकी लढत देत संघाचा डाव सावरला. त्याने २६ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार खेचत सर्वाधिक नाबाद ३१ धावांची खेळी केली. राजेश्वर सिंगटवाडने ११ धावा केल्या. सुभाष कवडे १२ धावांवर नाबाद राहिला. तलवारकडून रवी जाधव, रितेश, सुनील भोसले व मोईन पटेलने एक गडी बाद केला. सुनीलची अर्धशतकी खेळी : प्रत्युत्तरात तलवार टायटन्स संघाने ९.१ षटकांत ४ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात सलामीवीर सुनील भोसलेने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत अर्धशतक झळकावले. त्याने ३३ चेंडूंचा सामना करताना ७ चौकार व १ षटकार खेचत नाबाद ५० धावांची खेळी केली. रमेश पाटीलने १२ धावा जोडल्या. लहू आडे ४ धावांवर नाबाद राहिला. मुळेकडून प्रशांत आवारेने २ व सुभाष कवडेने एका गडी बाद केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.