आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउकुलहास (मालदीव) येथील वेस्टर्न एशिया यूथ चॅम्पियनशिपमध्ये औरंगाबादची युवा आंतरराष्ट्रीय खेळाडू तनिषा बोरामणीकरचे अवघ्या अर्ध्या गुणाने सुवर्ण हुकले. १६ वर्षांखालील गटात भारताचे प्रतिनिधित्व करताना तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे ताप आलेला असतानाही दुसऱ्या मानांकित तनिषाने ९ फेऱ्यांच्या या स्पर्धेत ७.५ गुणांची कमाई करत स्पर्धेत बाजी मारली. स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तनिषाला फिडेकडून वुमेन कॅडिडेट मास्टर (डब्ल्यूसीएम) पदवी प्रदान करण्यात येईल. तिचे भारताकडून प्रतिनिधित्व करताना एकूण पाचवे आंतरराष्ट्रीय पदक ठरले. तिच्या यशाबद्दल महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले, औरंगाबाद बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आमदार अतुल सावे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव हेमेंद्र पटेल यांनी अभिनंदन केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.