आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:एमआयडीसीचे पाइप फुटल्याने एन-5 जलकुंभावर भरणार टँकर

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयडीसीची पाइपलाइन फुटल्याने सिडको एन-१ मधील टँकरचा फिलिंग पॉइंट बंद पडला आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून महापालिकेचे २९ टँकर पुन्हा सिडको एन-५ च्या जलकुंभाकडे वळवण्यात आले आहेत. शहरातील पाणीटंचाईमुळे मनपाने एमआयडीसीकडे त्यांच्या जलवाहिनीतून येणारे पाणी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार तत्कालीन पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने एमआयडीसीने एन-१ येथील फिलिंग पॉइंटवरून टँकर भरण्याची परवानगी दिली. तेव्हापासून आतापर्यंत मनपाने गुंठेवारी भागाला पाणीपुरवठा करणारे टँकर एन-१ च्या पॉइंटकडे वळवले. येथून २९ टँकर भरले जात आहेत, तर एन-७ येथून १६, नक्षत्रवाडीतून १२ टँकर सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...