आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिक त्रस्त:न्यू बालाजीनगर, सिंधी कॉलनी, शिवशंकर कॉलनी परिसरात नळाला ड्रेनेजचे पाणी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यू बालाजीनगर, सिंधी कॉलनी, शिवशंकर कॉलनी परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून ड्रेनेज चोकअपची समस्या असून नळालाही ड्रेनेजचे पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. महानगरपालिका प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही कर्मचारी केवळ देखाव्यासाठी काम करून निघून जातात. समस्या मात्र कायम राहते. विशेष म्हणजे हा वॉर्ड माजी महापौर त्र्यंबक तुपे यांचा अाहे. निवेदने देऊनही काम होत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. न्यू बालाजीनगरच्या मुख्य रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी दिवसभर ओसंडून वाहते. ज्येष्ठ नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले आहे. अनेक घरांत ड्रेनेजचे पाणी शिरते. रहिवाशांना ते स्वखर्चाने काढावे लागते. आठवड्यातून एकदाच पाणी येते, त्यातही ड्रेनेजचे पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

काम सुरू न केल्यास आंदोलन करू वारंवार निवेदने दिली. प्रशासनाकडे फाइल पाठवली. ती पुढे का जात नाही हे काही कळत नाही. प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आहे. सात दिवसांत कामाला सुरुवात न झाल्यास नागरिकांना घेऊन मुख्यालयासमोर तीव्र आंंदोलन करू. - त्र्यंबक तुपे, माजी महापौर

घरासमोर ड्रेनेजचे चेंबर ओसंडून वाहते ड्रेनेजलाइन पूर्णपणे चोकअप झाली आहे. ती स्वच्छ केली जात नाही. त्यामुळे आमच्या घरासमोर असलेल्या ड्रेनेजचे चेंबर नेहमी ओसंडून वाहते. आमच्यासह परिसरातील नागरिकांना त्याचा मोठा त्रास आहे. - अशोक गुंजाळ, रहिवासी, न्यू बालाजीनगर

रस्त्यावरून चालताही येत नाही माझ्या गुडघ्यांचे ऑपरेशन झाले आहे. रस्त्यावरून ड्रेनेजचे पाणी ओसंडून वाहते. मी दुसऱ्या गल्लीत राहते. मुलीला भेटायला आले होते. रस्त्यावर चालताही येत नाही. प्रशासनाने समस्या सोडवावी. - सुभद्रा शिरसाट, ज्येष्ठ नागरिक

बातम्या आणखी आहेत...