आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजी:उद्दिष्ट 10,651 घरांचे, बांधली केवळ 1891, केंद्रीय मंत्री दानवे प्रधानमंत्री आवास योजनेवर नाराज

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेत मार्च २०२३ पर्यंत १०,६५१ घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्षात केवळ १८९१ घरेच बांधण्यात आली आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या बद्दल नगरपालिकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दानवेंनी प्रधानमंत्री आवास योजना आणि स्मार्ट सिटी संदर्भात आढावा घेतला. जिल्हाधिकारी अास्तिककुमार पांडेय, मनपा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, मनपा उपायुक्त अर्पणा गिते यांच्यासह सर्व नगरपंचायत, नगरपालिकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

दानवे म्हणाले की, मनपाच्या चाळीस हजार घरांचे काम सुरू होत नाही, हे चुकीचे आहे. यात तोडगा काढा. स्मार्ट सिटीच्या बस सेवेबाबत ते म्हणाले की, रेल्वेच्या वेळापत्रकानुसार बस सोडा. विमानतळ, रेल्वे स्टेशनसाठी फेऱ्या वाढवा. अजिंठा, वेरुळला पर्यटक एक दिवसापेक्षा अधिक थांबतील, असे नियोजन करा.

बातम्या आणखी आहेत...