आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

192 कोटींचे काम:चार महिन्यांमध्ये 900 मिमीची जलवाहिनी बदलण्याचे लक्ष्य ; तीन कंपन्यांनी भरल्या निविदा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासाठी २,७४० कोटी रुपयांची नवीन पाणी पुरवठा योजना होईपर्यंत ७०० मिमीची जुनी पाइपलाइन बदलून त्या ठिकाणी ९०० मिमीची पाइपलाइन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सुमारे ४५ किलोमीटर पाइप बदलण्याच्या या कामासाठी चार महिन्यांचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. फारोळा येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी ९ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंत यासाठी तीन कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतल्याची माहिती मनपातील सूत्रांनी दिली. निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मंगळवार (२० डिसेंबर) ही शेवटची तारीख आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत निविदा काढण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन रबडे यांनी १९३ कोटी रुपयांतून ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यासाठी अल्प मुदतीची निविदा १२ डिसेंबरला प्रसिद्ध केली.

हर्सूल तलावासाठी नवीन जलशुद्धीकरण केंद्र : पाणीटंचाई दूर करण्यासाठी हर्सूल तलावातील पाण्याचा उपसा वाढवण्यात आला. आणखी उपसा वाढवण्यासाठी जटवाडा रोडवर जुन्या जलशुद्धीकरण केंद्राच्या बाजूलाच नवीन ७ एमएलडीचे जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित केले आहे. यासाठी साडेचार कोटींचे अंदाजपत्रक तयार केले. १५ व्या वित्त आयोगाच्या कामातून होणारी बचत आणि निविदा न काढलेली कामे यातून होणारी यातून हे काम केले जाणार आहे. ही निविदा अंतिम मंजुरीच्या टप्प्यात आहे, ७ टक्के अधिक दराने ही निविदा भरण्यात आली आहे. पुढील आठवड्यात वर्कऑर्डर, बँक गॅरंटी आदी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नवीन वर्षात कामाचे नारळ फोडण्यात येईल.

असे आहे कामाचे स्वरूप { जायकवाडी ते ढोरकीनपर्यंत ९०० मिमीची नवी जलवाहिनी टाकणे. { ढोरकीन ते फारोळा केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकणे. { फारोळा ते नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिनी टाकणे. { फारोळा येथे २४ एमएलडीचे जलशुद्धीकरण केंद्र उभारणे.

बातम्या आणखी आहेत...