आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला आघाडीच्या सुवर्णा काटे यांचाही प्रवेश:शेतकरी संघटनेचे तवार, बिंदू भारत राष्ट्र समितीमध्ये दाखल

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधीर बिंदू मराठवाडाप्रमुख कैलास तवार यांच्यासह शेतकरी संघटनेतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समिती पक्षामध्ये प्रवेश केला. महिला आघाडीच्या सुवर्णा काटे यांच्यासह राज्यभरातील दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांनीही भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. या वेळी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शरद जोशींच्या विचारांवर आपली लढाई असून शरद जोशींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण एकत्र काम करून देशात व राज्यात ‘किसान सरकार’ स्थापन करू, असे आवाहन त्यांनी केले.

शेतकरी हिताची धोरणे राबवणार भारत राष्ट्र समिती हे शेतकरी हिताची धोरणे ठरवण्यासाठीचे राजकीय आंदोलन आहे. या माध्यमातून शेतकरी हिताची धोरणे देशभर राबवणार असल्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री व बीआरएसचे संस्थापक अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले.