आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटीच्या वसुली पथकाने छापा:जालना रोडवरील सराफा दुकानावर कर पथकाचा छापा; उशिरापर्यंत चौकशी

छत्रपती संभाजीनगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील एका सराफा दुकानावर शुक्रवारी जीएसटीच्या वसुली पथकाने छापा घातला. दुपारी एक वाजेपासून रात्री ११:३० वाजेपर्यंत कर विभागाचे पथक दुकानात तपास करीत असल्याची माहिती आहे. दुकानातील कर्मचाऱ्यांना या वेळेत दुकानातच थांबवून ठेवण्यात आले होते.

आर्थिक वर्षातील अखेरचा महिना असल्याने करवसुली यंत्रणा सक्रिय झाली आहे. जालना रस्त्यावरील एका सराफा दुकानावर जीएसटीच्या वसुली अधिकाऱ्यांनी छापा टाकला. सुमारे १० तास अधिकाऱ्यांनी दुकानातील व्यवहारांची चौकशी केली. संपूर्ण कर्मचारी आणि व्यवस्थापकांना दुकानातच थांबवले होते. दुपारनंतर दुकानाचे मालक शहरात पोहोचल्यावर पुढील चौकशी करण्यात आली. रात्री साडेअकरापर्यंत ही चौकशी सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...