आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीचा हात:शिक्षकाने जपली माणुसकी, शेतातील आठ पोते गव्हाचे गोरगरिबांना केले वाटप

औरंगाबाद3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • शिक्षकाच्या पत्नीनेही दर्शवली सहमती, तहसीलदारांची परवानगी घेत गरीब कुटुंबांना केली मदत

कोरोनाच्या काळात एकीकडे मदतीसाठी हजारो हात पुढे येत असतानाच उद्याच्या काळजीने सर्वच गोष्टींचा साठा करून ठेवण्याची प्रवृत्तीही वाढली आहे. अनेक ठिकाणी माणसातील माणुसकी हरवत चाललेली पाहायला मिळते; पण या प्रवत्तीला छेद दिलाय ज्ञानेश्‍वरवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अय्युब शेख यांनी त्यांनी स्वतःच्या शेतात पिकवलेले दहापैकी आठ पोती धान्य गोरगरिबांची चूल पेटविण्यासाठी वाटून दिले. 

लॉकडाऊनमळे गरजू व गरीब आदिवासी बांधवांना पंधरा दिवसांपासून रोजगार नसल्यामुळे घरातच बसण्याची वेळ आली आहे. कुरणपिंपरी येथील मुख्याध्यापक अय्युब उस्मान शेख यांना तुकारामाचे अभंग, हरिपाठ तसेच कुराण तोंडपाठ आहे. गोरगरिबांची उपासमार त्यांनी जवळून पाहिली. दलित वस्तीवरील मुलांची भाकरीसाठी उन्हातान्हात गावात फिरणे पाहून त्यांचे मन गहिवरून आले. त्यांनी पत्नीशी चर्चा करत शेतातील दहापैकी आठ पोती गरीब मजुरांना वाटण्याचा विचार व्यक्त केला. पत्नीनेही त्यांना पाठिंबा दर्शविला. त्यासाठी तहसीलदार यांची परवानगी घेऊन त्यांनी आपेगाव तसेच परिसरातील वाड्या, वस्त्यावरील गरजू, गरीब कुटुंबाला प्रत्येकी पाच किलो धान्य वाटप केले. यासाठी गावातील पोलिस पाटील व कोतवाल यांच्या मदतीने सोशल डिस्टन्स ठेवत धान्य वाटप करण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...