आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणूक:एक ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी; 30 डिसेंबरला तयार होईल नवी शिक्षक मतदार यादी

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीचा बिगुल वाजला आहे. पदवीधर मतदारांप्रमाणे शिक्षकांची मतदारयादीही प्रत्येक सहा वर्षांनी नव्याने गठित केली जाते. महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जुलै-2022 दरम्यान कार्यक्रम घोषित केला आहे. 30 डिसेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल. मागील वेळी 48 हजार मतदार होते. सहा वर्षांत शिक्षक भरती झाली नाही. उलट निवृत्तांची संख्या वाढल्याने 48 हजार पेक्षा कमी मतदार नोंदणी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे सध्या शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. फेब्रुवारी-2017 मध्ये झालेल्या निवडणूकीत त्यांनी भाजपच्या सतीश पक्ती यांचा पराभाव केला होता. आमदार काळे यांनी मोर्चेबांधणीस सुरूवात केली आहे. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात प्रत्येक शाळांना भेटी-गाठीची मोहिम त्यांनी सुरू केली आहे. शिवाय शिक्षकांना एकत्र करून जनता दरबार भरवण्यावर त्यांचा सध्या जोर आहे. यावेळीही नव्याने शिक्षक मतदारयादी तयार केली जाणार आहे. भाजप-सेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने त्यासाठी व्युहरचना आखण्यास सुरूवात केली आहे. निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी अधिनियम-1960 च्या कलम 31 (3) आणि 31 (4) नुसार मतदार नोंदणीचा कार्यक्रम घोषित केला आहे. 1 ऑक्टोबरला मतदार नोंदणी सुरू होईल. 15 आणि 25 ऑक्टोबरपर्यंत नोंदणीसाठी पुर्नप्रसिद्धी दिली जाईल. नोंदणीनंतर ७ नोव्हेंबरला हरकती आणि दावे स्वीकारण्यात येतील. 19 नोव्हेंबरला पहिली प्रारूप मतदार यादीची छपाई होऊन 23 नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. पुन्हा 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान हरकती घेतल्या जातील. 25 डिसेंबरला सुनावणी घेऊन हरकती निकाली काढल्या जातील. मग, 30 डिसेंबरला अंतिम मतदार यादी गठित होणार आहे.

1 जानेवारीला अधिसूचना जारी होईल

मतदार यादी गठित झाल्यानंतर निवडणूक आयोग 1 जानेवारीला अधिसूचना जारी करण्याची शक्यता आहे. त्यानंतर नामांकन दाखल करणे, नामांकन मागे घेण्याची प्रक्रिया केली जाईल. 7 फेब्रुवारी 2023 रोजी विक्रम काळे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपणार आहे. त्याआधीच मतदान घेेऊन मतमोजणीची प्रक्रिया करणे निवडणूक आयोगाला क्रमप्राप्त आहे.

बातम्या आणखी आहेत...