आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी वृत्त:वाळूज परिसरात शिक्षिकेचा विनयभंग; तरुणावर गुन्हा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्रजी माध्यमाच्या शिक्षिकेचा सतत पाठलाग करूनही तिने प्रतिसाद न दिल्याने ज्ञानेश्वर शंकर चौधरी (२३) या तरुणाने फेसबुकवर तिच्या नावाचा उल्लेख करत पाेस्ट शेअर केली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार शिक्षिका कुटुंबासह वाळूज परिसरात राहते. गेल्या अनेक दिवसांपासून ज्ञानेश्वर पाठलाग करत होता. १८ ऑक्टोबरपासून त्याने शिक्षिकेचा थेट दुचाकीवरून पाठलाग सुरू केला. काही दिवस रस्त्यात थांबवण्याचा प्रयत्नही केला. तसेच, शाळा सुटल्यानंतर देखील शाळेबाहेर उभे राहणे सुरू केले. या प्रकारामुळे शिक्षिका घाबरली असल्याने तिने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर ज्ञानेश्वर शांत झाला. मात्र, त्याने ३० ऑक्टोबर रोजी पुन्हा पाठलाग केला.

त्यानंतर फेसबुकवर शिक्षिकेच्या नावाचा उल्लेख करून माफी मागण्याचे नाटक केले. परंतु, ज्ञानेश्वरने फेसबुकवर आपल्या नावाने जाहीररीत्या पोस्ट लिहिल्याचे शिक्षिकेला कळाले. त्यामुळे शिक्षिकेने तत्काळ एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून ज्ञानेश्वरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...