आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांची भरती करताना दबाव झुगारून काम करा:स्वाभिमानी मुप्टाचे शिक्षण उपसंचालकांकडे मागणी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षकांची भरती करताना मुल्यांकन प्रस्तावासोबत शिक्षक-कर्मचारी यादीची तपासणी करावी. 2017 ते 2022 दरम्यानच्या संचमान्यतेची तपासणी करावी, वर्तमानपत्रात दिलेल्या जाहीरातीची खातरजमा करावी तरच शिक्षकांच्या नियुक्त्यांना मान्यता द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी मुप्टाच्या वतीने करण्यात आली आहे.

शनिवारी (6 जानेवारी) संस्थापक अध्यक्ष तथा नवनिर्वाचित अधिसभा सदस्य डॉ. शंकर अंभोरे आणि प्राचार्य डॉ. किशोर साळवे यांच्या नेतृत्वात शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी ही मागणी केली आहे.

निवेदनात असे म्हटले आहे की, ‘औरंगाबाद विभागात बहुतांश शैक्षणिक संस्था राजकीय नेत्यांच्या आहेत. शिक्षक भरती करताना शासनाच्या नियमांना डावलून ते निकटवर्तीयांची भरती करतात. त्यामुळे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केली जाणारी भरती प्रक्रिया पारदर्शक असते. पण मागच्या दरवाज्याने काही हस्तकांच्या मार्फत संस्थाचालक नियमबाह्य शिक्षकांच्या नियुक्या करतात.

मान्यता मिळविण्यासाठी आपल्या कार्यालयावर दबाव टाकतात. अशा नियमबाह्य मान्यतांचे ढिगभर पुरावे संघटनेने देऊनही आपल्या कार्यालयाने काहीच ठोस निर्णय घेतला नाही. सध्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक घोषित झाली आहे. आता तर आचारसंहिता असतानाही शिक्षक मतदारांना खूश करण्यासाठी निधी गोळा केला जात आहे. त्यामुळे वर्तमानपत्रातील जाहीरात, वर्तमानत्राचे वितरण याची खात्री करून घ्यावी. मान्यतेच्या प्रस्तावांची काळजीपुर्वक तपासणी करावी.

विद्यार्थी संख्या अभावी बंद पडलेल्या तुकड्यांवरील शिक्षकांच्या बदल्या नियमबाह्य अनुदानित तुकड्यावर केलेल्या आहेत. अशा सर्व बदल्यांची चौकशी करून संबंधीत अधिकारी व कर्मचान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, जात वैधता प्रमाणपत्राची तपासणी करावी, नियुक्तीचे बोगस प्रस्ताव आढळले तर प्राचार्य, मुख्याध्यापकांना कडक कारवाई करावी अशी मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत. अन्यथा अंदोलन करण्याचा इशारा डॉ. विजय बसाने, डॉ. युवराज धबडगे, अनिल पांडे, डॉ. राहुल तायडे, विलास पांडे, डॉ. बाळासाहेब लिहिणार यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...