आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. पदवीधर मतदारांप्रमाणे शिक्षकांची मतदार यादीही प्रत्येक सहा वर्षांनी नव्याने गठित केली जाते. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जुलै-२०२२ दरम्यान कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे ३० डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. गेल्या वेळी ४८ हजार मतदार होते. गेल्या सहा वर्षांत शिक्षक भरती झाली नाही. उलट निवृत्तांची संख्या वाढल्याने ४८ हजारांपेक्षा कमी मतदार नोंदणी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या राष्ट्रवादीचे विक्रम काळे शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. फेब्रुवारी-२०१७ मध्ये त्यांनी भाजपच्या सतीश पत्की यांचा पराभव केला होता. काळे यांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. त्यांनी मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यातील प्रत्येक शाळांना भेटीगाठी देत मोहीम सुरू केली आहे. शिवाय शिक्षकांना एकत्र करून जनता दरबार भरवण्यावर सध्या त्यांचा जोर आहे.
काळेचे सदस्यत्व ७ महिने
निवडणूक आयोग १ जानेवारीला अधिसूचना जारी करू शकतो. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी विक्रम काळे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपणार आहे. त्याआधीच मतदान घेेऊन मतमोजणीची प्रक्रिया करणे आयोगाला क्रमप्राप्त आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.