आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणींना उजाळा:गोदावरी स्कूलच्या शिक्षक-विद्यार्थ्यांनी 32 वर्षांनंतर दिला आठवणींना उजाळा

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बत्तीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या हडकोतील गोदावरी पब्लिक स्कूलचे शिक्षक-विद्यार्थी जुन्या आठवणींत रमले होते. रविवारी एका खासगी हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात अध्यापनाचे ध्येय उराशी बाळगून विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. पुणे, मुंबई, बंगळुरू आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. माजी विद्यार्थी व शहरातील गायक राजेंद्र वैराळ यांच्या ऑर्केस्ट्राने कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली. या वेळी गोदावरी पब्लिक स्कूलचे शिक्षक सतीश सूर्यवंशी, दिलीप सूर्यवंशी, सुधा वराळे, बबन माळी, सुदाम नलावडे, रंजना रांजणीकर, रमा टंकसाळे, रोहिणी गरभे, विमल पाटील, नीलिमा चव्हाण, वैशाली घोरपडे आदींचा गौरव करण्यात आला. सोहळ्याच्या यशस्वितेसाठी राजेंद्र वैराळ, सतीश चौतमल, विजय गायकवाड, गिरीश जोशी, महेश पाथरीकर, सुनील गोरे, उमेश सोनवणे, दीपक सोनार, मयूर मारवाडे, संतोष घोडतुरे, रामदास गाडे, संतोष दाभाडकर, सुनील पाडळकर, अलका मारावार, वैशाली सुरवसे, सुनीता बोरबणे, करुणा सावजी, प्रणिता कुलकर्णी, दीपाली आपटे, सुरेखा खापरे, वैशाली दांडेकर, कलामती डोपे, अनिता मेवाड आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...