आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ:शिक्षकांनो, वेळेवर शाळेत येऊन वर्ग भरवा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता राखा

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत, माेहीम सुरू केल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या कानपिचक्या घेत कानमंत्र दिला. शाळेत वेळेत हजर राहून वर्ग सुरू करा. आपण विद्यार्थी अन् समाज घडवण्यासाठी पगार घेता. तेव्हा शैक्षणिक वातावरण चांगले ठेवण्याबरोबरच गुणवत्ता राखण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले.

जिल्हा परिषदेच्या वतीने सोमवारी शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. चव्हाण यांच्या हस्ते २१ शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. या वेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे संचालक डॉ. कलिमोद्दीन शेख, विस्तार अधिकार आर. व्ही. ठाकूर, एल. ए. सोफी, संगीता सावळे, संदीप पवार यांची उपस्थिती होती. चव्हाण म्हणाले, आमच्या वेळी मुख्याध्यापक वर्गावर येणार किंवा शाळेत शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी येणार म्हटले की भीती असायची. आता शाळांमध्ये अधिकारी येणार म्हटले की प्रसन्न वातावरण अन् खान-पानाची चंगळ असते. केंद्र आणि राज्य सरकार शिक्षणावर माेठा खर्च करते. शिक्षकांनी मुलांची गुणवत्ता वाढवावी, एवढीच ग्रामस्थांची अपेक्षा असते. डॉ. शेख म्हणाले, विद्यार्थी घडवण्यात शिक्षकांचे योगदान मोलाचे आहे. विद्यार्थी हाच शिक्षकांसाठी दैवत आहे. शिक्षकांनाही आनंद वाटेल असे त्यांनी शिकवले पाहिजे, असे गटणे म्हणाले.

या शिक्षकांचा झाला सन्मान प्राथमिक विभाग : वर्षा देशमुख, शिवाजी डुकरे, मनोजकुमार सरग, भगवान जगताप, सनी गायकवाड, दादाराव सोनवणे, सदाशिव बडक, दत्तात्रय मरळ, दीपक महालपुरे आदी. माध्यमिक विभाग : विद्या सोनगिरे, गणेश सुरवाडकर, ताराचंद हिवराळे, ब्रह्मदेव मुरकुटे, देविदास बाविस्कर, धनराज चव्हाण, प्रदीप सोनार, जगन खंडागळे आदी. विशेष पुरस्कार : बापू बावीस्कर, शैलेश जावळे, नितीन गबाले, मनोहर लबडे, मुरलीधर लगड.

बातम्या आणखी आहेत...