आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:गृहविलगीकरणातील रुग्णांवर शिक्षकांची नजर; मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचे नियुक्तीचे आदेश

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आल्यानंतर ग्रामीण भागातील रुग्ण गृहविलगीकरणात राहण्याची विनंती करतात. त्यांना तसी परवानगी दिली जाते. मात्र नंतर बाधित बाहेर फिरताना दिसून येत असून त्यातून संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे अशा रुगणांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांवर साेपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील गृहविलगीकरणात राहिलेल्या रुग्णांसाठी प्राथमिक आराेग्य केंद्रात एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या नियंत्रण कक्षात प्राथमिक आराेग्य केंद्राच्या अंतर्गत येणारी कराेनाबाधितांची रुग्णसंख्या विचारात घेता 2 ते 5 प्राथमिक शिक्षकांना नियुक्त करण्यात येईल. नियंत्रण कक्षास संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना गावनिहाय गृहविलगीकरणातील रुग्णांची यादी, त्यांचे माेबाईल फाेन क्रमांकही उपलब्ध करून द्यावे लागतील. प्रत्येक दिवशी नव्याने गृहविलगीकरण केलेल्या रुग्णांचा तपशीलही नियंत्रण कक्षाला द्यावा लागणार आहे.

शिक्षकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियंत्रण कक्ष प्राथमिक आराेग्य केंद्राएेवजी शाळेत स्थापन करण्यात येईल. कक्षात नियुक्त कर्मचाऱ्याच्या दिवशी 10 ते 5 या वेळेपर्यंत उपस्थित राहन संबंधित रुग्णास किमान संपर्क करून रुग्ण गृहविलगीकरणातच आहे किंवा कसे, याची खात्री करावी लागणार आहे. कराेनाचा रुग्ण बाहेर पडत असेल तर ताे साथराेग अधिनियमान्वये कारवाईस पात्र ठरताे. गृहविलगीकरणात असलेल्या व्यक्तीच्या घरात स्वतंत्र खाेली नसेल तर त्याला शाळेची खाेली उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. या संदर्भातील आदेश आैरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गाेंदावले यांनी काढले आहेत. गटशिक्षणाधिकारी, तालुका आराेग्य अधिकाऱ्यांसाठीचा हा आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी २८ एप्रिल राेजी केलेल्या गंगापूर तालुका दाैऱ्यादरम्यानच्या सूचनेंतर काढल्याचे डाॅ. गाेंदावले यांनी सांगिhomelessnesspatientsतले.

तपासणी चाैक्यांवरही शिक्षक

आैरंगाबाद जिल्हयात अहमदनगर, जळगाव, बीड, बुलडाणा, जालना आदी लगतच्या जिल्हयातून प्रवासी वाहने प्रवेश करत आहेत. तपासणी चाैकीवर ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे आंतर जिल्हा तपासणी चाैक्यांवर तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क करावा व प्रत्येक चाैकीवर जिल्हा परिषद कर्मचारी अथवा शिक्षकांना तेथे नियुक्त करावे. संबंधित शिक्षक याेग्यरीत्या कर्तव्य बजावताे का नाही, याची खातरजमा करावी, असेही आदेशात म्हटले आहे.

रुग्णांची यादी ग्राम दक्षता समितीस वर्ग

सर्दी, ताप, खाेकला ही लक्षणे असलेली तसेच ज्यांची आॅक्सिजन पातळी 95 टक्क्यांपेक्षा कमी आहे अशा रुग्णांची यादी ग्रामदक्षता समितीकडे वर्ग करण्यात यावी. समितीने रुग्णांचे समुपदेशन करून ते प्राथमिक आराेग्य केंद्रात तपासणी करून घेतील. यासाठी कार्यवाही करावी, असेही आदेशात म्हटले आहे. अशा रुग्णांची यादी अंगणवाडी कार्यकर्ती, आशा वर्कर्स, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, यांच्यामार्फत सर्वेक्षण हाेऊन आराेग्य विभागाकडे पाठवली जाते.

बातम्या आणखी आहेत...