आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:विद्यार्थ्यांची आधार नोंदणी नसेल तर शिक्षकांची नोकरी धोक्यात, शिक्षक संघटनांमध्ये नाराजी

औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी अद्ययावत करण्याचे काम ३० सप्टेंबरपर्यंत करावे. यापुढील संच मान्यता केवळ आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार करण्यात येणार आहे. आधार नोंदणीचे काम अपूर्ण राहिले तर कमी दिसणाऱ्या पटसंख्येमुळे शेकडो शिक्षकांची पदे संच मान्यतेत कमी होतील, असे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, या निर्णयाबाबत संस्था, शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली.

आधार क्रमांक असलेल्या विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक पदे निश्चित करणार, असा आदेश काढण्यात आला आहे. आधार नसलेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धरणार नसतील, तर शाळा व शिक्षकांनी आधार नसलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारणे किंवा तशी मुले शाळांनी पटावरून काढली तर शिक्षण हक्क कायद्यात बसेल का? कोरोनामुळे १८ महिन्यांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्या मुलांना शिक्षण देण्यासाठी शिक्षक आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. मात्र, आधार सक्तीसारखे पत्र काढून शासन आधार नसलेल्या मुलांवर अन्याय करत आहेत. ३० सप्टेंबर रोजीच्या विद्यार्थी संख्या संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्याची प्रचलित पद्धत आहे. तो दिवस जवळ येत असताना आधार सक्तीचे पत्र काढून शासन शाळा व शिक्षकांना अडचणीत ढकलत आहे, असा आरोप शिक्षक, मुख्याध्यापकांकडून केला जात आहे.

शिक्षकांचे वेतन बंद, शिक्षण विभागाकडून आदेश
वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ या दोन वर्षांच्या संच मान्यतेकरिता वर्किंग पोस्टची माहिती भरून अंतिम करण्याची कार्यवाही सप्टेंबरअखेर पूर्ण करण्याबाबत शाळांना सूचना दिल्या आहेत. या मुदतीत ज्या शाळा, मुख्याध्यापकांकडून माहिती सादर करणार नाहीत, त्यांचे ऑक्टोबर २०२१ चे वेतन अदा केले जाणार नाही, असेही आदेश जगताप यांनी जारी केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...