आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कफील एज्युकेशनल सोसायटी:शिक्षकांनी अभ्यासक्रम पूर्ण न करता शैक्षणिक दर्जा वाढवावा : संजीव सोनार

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजातील महत्त्वाच्या व्यक्तींकडून शिक्षकांचे स्वागत होत आहे. त्यामुळे शिक्षकांची अध्यापनाची जबाबदारी वाढली आहे. शिक्षकांनी अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर न देता शैक्षणिक दर्जा उंचावला पाहिजे, असे मत मनपाचे अतिरिक्त शिक्षणाधिकारी संजीव सोनार यांनी व्यक्त केले. कफील एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटी आणि शम्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रहेमानिया कॉलनी येथील यशोधरा मनपा शाळेत शिक्षकांच्या स्वागत समारंभात ते बोलत होते. या वेळी डॉ. गझाला परवीन, मसिया बेगम, डॉ. शाहीन फातिमा, अभियंता रमझानी खान, फिरदोस फातिमा, चंद्रकला वाघचौरे सहभागी होते.

“अध्यापन एक पवित्र व्यवसाय आहे. ज्याचा प्रत्येक युगात आणि प्रत्येक स्तरावर आदर केला जातो. हिटलरने आयुष्यात कोणाचाही आदर केला नाही, परंतु त्याने नेहमीच शिक्षकांचा आदर केला.’ या वर्णनात्मक शब्दांत मुकीम खान यांनी शिक्षकांचे स्थान आणि पद यांचे वर्णन केले. झारा अंजुम यांच्या कुराण पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाइस्ता आरिफने नात सादर केली. या वेळी ४५ शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात आले. तसेच स्वप्निल खिल्लारे, अबुबकर हादी, राजेश पडळकर यांच्या सहकाऱ्याने सर्व शिक्षकांची बोन डेन्सिटी तपासणी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...