आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविज्ञानाचे प्रयोग म्हटलं की चार भिंतीच्या आड असलेले काचेचे साहित्य, केमिकलचा वास असेच चित्र डोळ्या समोर उभे राहिते. तर गंभीर होवून प्रयोग पाहण आणि तो अनुभव काहींना चांगल तर काहींना कंटाळवाणही वाटत. परंतु हेच प्रयोगाच साहित्य टाकाऊपासून आणि घरातील छोट्या छोट्या वस्तूंपासून समायोजयोगी आणि निसर्गाचे नियम समजून सांगणार खेळता-खेळता प्रयोग शिकवणार ठरलं तर? किती मज्जा ना! अगदी अशीच मज्जा आता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहे.
हो पण ही विज्ञानाची गंमत आधी शिक्षक करुन पाहणार असून, त्यानंतर या गंमती-जमती सोप्या पद्धतीने मुलांना शिकवणार आहेत. यासाठी औरंगाबाद शहरातील 12 शाळेतील विज्ञान शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत असून, शिक्षकांना वर्गानुसार शिक्षक गतिविधी पुस्तिका विज्ञान साहित्य पेटीसह देण्यात आली आहे.
प्रयोगशाळेत बसण्याची गरज
गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच मुलांना शाळेची गोडी निर्माण व्हावी, विज्ञानातील संशोधनवृत्ती वाढीस लागावी. यासाठी विज्ञान साहित्य पेटी शिक्षकांना देण्यात आली आहे. याचा उपयोग प्रथम शिक्षकांनी करायचा असून, प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि जिल्हा गुणवत्ता कक्ष आणि ओसका फाऊंडेशनच्या माध्यमातून शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे. या गतिविधी पुस्तिकेत कृतीयुक्त विज्ञान कसे शिकवावे याची माहिती देण्यात आली आहे. तसेच प्रयोग शिकण्यासाठी प्रयोगशाळेत बसण्याची गरज आहे असे नाही छोट्या साहित्याच्या माध्यमातूनही प्रयोग शिकवता येवू शकतो. असे प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे संचालक डॉ. कलिमोद्दीन शेख यांनी सांगितले.
जसे की फुग्याची कार
आता फुग्याची कार कशी तयार होणार असा प्रश्न पडला ना. तर शास्त्रीय तत्त्व व दैनंदिन जीवनातील उपयोग उपक्रम याचाही या पुस्तिककेत विस्तार करण्यात आला आहे. तो असा कशी बर होते फुग्याची कार कशी कार्य करते यासाठी मुलांना प्रत्यक्ष फुगा देवून जेंव्हा फुगवतो तेंव्हा फुग्याची कार स्थितिज ऊर्जेमुळे कधी आणि गतिज ऊर्जेमुळे कधी धावते असे विचारले तर जेंव्हा फुग्यातून बाहेर येणाऱ्या हवेमुळे धावते, फुग्यातील हवा बाहेर गेलेली असतानाही कार धावत रहाते ती कशी अशा गंमती -जमती शिक्षकही प्रत्यक्ष प्रशिक्षण घेत आहेत.
पेपर ग्लास, दोरा, गाड्यांची पेटी, टाकाऊ पेपर घरात टाकून दिलेल्या वस्तूंपासूनही विज्ञान शिकता येवू शकते. साध सोप टाकाऊतून टिकाऊ शिकवण्यासाठी पुस्तक उपयुक्त आहे. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयानुरुप सोप कस शिकाव यासाठी शिक्षकांसाठी पुस्तिका असून, यात प्रथम शिक्षकांनी प्रशिक्षण घेत विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे.-ए.के. फुंदे, विज्ञान शिक्षक कमलसिंग नाईक शाळा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.