आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावीच्या तासिका सोमवारपासून:सीबीएसईच्या निकालामुळे प्रवेशाला वेग, 1 ऑगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण करणार

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​​अकरावी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या तासिकांना सोमवारपासून (ता. २५) सुरुवात होणार आहे. तर, नव्याने प्रवेश घेणाऱ्या सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये यासाठी त्यांचा अभ्यासक्रम हा अधिकचे तास घेवून पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती शहरातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी दिली.

उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी-बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला. त्यामुळे उर्वरित प्रवेश प्रक्रियेला वेग येणार आहे. अकरावीला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे तास नेमके कधी सुरु होणार, याची प्रतीक्षा विद्यार्थी व पालकांनी होती. ही प्रतीक्षा आता संपली आहे. येत्या सोमवारपासून अकरावीचे तास सुरु होणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा नुकताच निकाल लागला असून त्यांचे प्रवेश १ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येतील. त्या विद्यार्थ्यांच्या तासिकांनादेखील त्वरीत सुरुवात करण्यात येईल. या विद्यार्थ्यांचेदेखील नुकसान होणार नाही, याची काळजी घेतील जाणार आहे.

महाविद्यालयांत पालक मेळावे

महाविद्यालयांमध्ये पालक मेळावे घेण्यात येत असून तासिका आणि नव्या बदलांसंदर्भातही माहिती देण्यात येत असल्याचे महाविद्यालयांमधील प्राध्यापकांनी सांगितले. कोविडमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या क्षमतांवर परिणाम झाला. त्यात सुधारणा करण्यासाठी समुपदेशनही महाविद्यालयांमध्ये करण्यात येत असल्याचे प्राचार्यांनी सांगितले.

पदवी प्रवेशांनाही वेग

सीबीएसईच्या निकालामुळे अकरावीसह आता बारावीच्यानंतरच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांनाही वेग येईल. विद्यापीठाने अद्याप पदवी प्रवेशासाठी अखेरच्या मुदतीबाबत स्पष्टता केलेली नाही. हे प्रवेश १ ऑगस्टपर्यंत पूर्ण करुन पदवीच्याही तासिकांना सुरुवात करण्यात येईल.

विद्यार्थ्यांची भीती दूर करणार

देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन. जी. गायकवाड यांनी सांगितले की, सोमवारपासून अकरावीचे तास सुरु होतील. त्यापूर्वी विद्यार्थी आणि पालकांचे समुपदेशन करण्यात येत आहे. जेणेकरुन विद्यार्थी नियमित तासिकांना उपस्थित राहतील. शिवाय मुलींना बऱ्याचवेळा अडचणी आल्या तर त्या पालकांना सांगण्यासाठी घाबरतात. त्यांचीही भिती दूर करण्यासाठी विषय तज्ज्ञ आणि समुपदेशांकच्या माध्यमातून संवाद साधण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...