आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्दी:कृषी प्रदर्शनात तंत्रज्ञान, अवजारे, ई-वाहनांचे आकर्षण

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण राेडवरील कृषितंत्र विद्यालयाच्या मैदानावर आयाेजित कृषी प्रदर्शनात नवीन तंत्रज्ञान, बी-बियाणे, अवजारे, ई-वाहने विद्यार्थी, शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. उत्पादकांनी विविध स्टाॅल मांडल्याने ग्राहक थेट अन्नधान्य खरेदीकरिता येत आहे. शिवाय खाद्यपदार्थांची चव चाखण्यासाठीही गर्दी हाेत आहे.

वातानुकूलित ट्रॅक्टर ठरतेय लक्षवेधी : ८४ एचपी क्षमतेचे बेलारूस ट्रॅक्टर आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. वातानुकूलित केबिन, नऊ फुटांपेक्षा उंच आहे. त्यामुळे चालकाला चढण्यासाठी पायऱ्या आहेत. चार सिलिंडर इंजिनचे हे अत्याधुनिक ट्रॅक्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. याची किंमत ९ लाखांवर आहे. यावर शासनाच्या नियमाप्रमाणे सबसिडी मिळते.

ई-वाहने : ई-ऑटोरिक्षा, स्कूटर, गुड्स करिअर आदी वाहने प्रदर्शनात ठेवली आहेत. अनेक लाेक या वाहनांची माहिती घेत आहेत. नवीन संशोधित बी-बियाणे : टोमॅटो, कोबी, कांदा, मिरची, लसूण, भेंडी, मका, टरबूज, खरबूज, झेंडू फुले, कारले, कपाशी, तूर, जांब, चकोतरा आदी पिकांचे नवीन संशोधित बी-बियाणे येथे विक्रीस उपलब्ध आहे.अन्नधान्य खरेदीला वेग : गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी, डाळी, गूळ, घाण्याचे करडई तेल, हळद, मसाले थेट उत्पादकांकडून ग्राहक खरेदी करत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील मांडे आणि सार, आपल्याकडील पुरणपोळी, भरीत आणि भाकरी, बेसन-भाकरी, पश्चिम महाराष्ट्रातील तांबडा, पांढरा रस्सा असलेले चिकन आणि मटण, इडली सांबर अशा खाद्य पदार्थ उपलब्ध आहे.

सिंगल सिलिंडर इंजिन ट्रॅक्टर पाहण्यासाठी गर्दी २० आणि २८ एचपीचे सिंगल सिलिंडर इंजिनचे अतिशय लहान आणि तेवढ्याच पॉवरच्या ट्रॅक्टरलाही पसंती मिळत आहे. ३.७५ लाख आणि ५.९० लाख रुपये किंमत आहे. सव्वा लाखांपर्यंत सबसिडी मिळते. याचबरोबर ५८ आणि ४६ एचपीचे ट्रॅक्टर असून त्यांच्या ७.८५ ते ९.५८ लाख रुपये किमती आहेत. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण ट्रॅक्टरविषयी जाणून घेताना दिसत आहे. पॉवर टिलर, नांगर फाळ, तण काढणे, गहू कापणे, फवारणी, शेततळे कापड, गांडूळ खतनिर्मिती, कडबा कटर, तेल उत्पादन मशीन, खोडवा कटर, सिंचन आदी तंत्रज्ञानाविषयी शेतकरी माहिती जाणून घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...