आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

धक्कादायक:शेकडो विद्यार्थ्यांच्या मंगळवारी मुलाखती घेणारे मुखेडचे तहसीलदार बुधवारी पाॅझिटिव्ह; उमेदवारांत खळबळ!

नांदेड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुखेडच्या तहसीलदारांचा बुधवारी रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये अहवाल पॉझिटिव्ह आला. तहसीलदारच पॉझिटिव्ह निघाल्याने तहसील कार्यालय पूर्णपणे बंद करण्यात आले अाहे. दरम्यान, तहसीलदारांनी मंगळवारी आरोग्य विभागातील कंत्राटी पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यामुळे मुलाखतीला गेलेल्या उमेदवारांतही धाकधूक वाढली आहे.

मुखेड तालुक्यात कोरोनाचा प्रसार वाढला असून कोरोनाच्या रुग्णाची संख्या तीनशेवर गेली आहे. मुखेडच्या तहसीलदारांनी सुरुवातीपासून कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी स्वत:ला झोकून देऊन काम केले. आरोग्य विभागाच्या अडचणी असो, रुग्णालयातील रुग्णांच्या समस्या असो, पत्रकारांना वेळोवेळी माहिती देणे असो किंवा रुग्णांना गरम पाण्याची सुविधा देण्यापासून ते जेवणापर्यंत तहसीलदारांनी स्वत: अडचणी सोडवल्या आहेत.

आरोग्य विभाग रडारवार

मंगळवारी आरोग्य विभागाची कंत्राटी पदासाठी भरती होती. या भरतीसाठी शेकडो विद्यार्थी मुलाखतीसाठी आले होते. विद्यार्थ्यांच्या कागदपत्र तपासणीसाठी व मुलाखतीसाठी तहसीलदार यांच्यासह अनेक बड्या अधिका­ऱ्यांची उपस्थिती होती. तहसीलदारांच्या पॉझिटिव्ह अहवालामुळे अधिकाऱ्यांसह शेकडो विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक वाढली आहे. तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारीही या वेळी उपस्थित होते. तहसीलदारांच्या संपर्कातील चालक व शिपाई यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले.