आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन‎:वाढीव ग्रेड पेसाठी केले‎ तहसीलदारांनी आंदोलन‎

छत्रपती संभाजीनगर‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रेड पे वाढवून मिळावा या‎ मागणीसाठी विभागातील‎ तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी‎ विभागीय आयुक्त कार्यालयासमोर‎ आंदोलन केले. आंदोलनात‎ मराठवाड्यातील तहसीलदार, नायब‎ तहसीलदार सहभागी झाले.‎ महसूल विभागातील नायब‎ तहसीलदार, राजपत्रित वर्ग-२ हे‎ अत्यंत महत्त्वाचे पद आहे. मात्र या‎ पदाचे वेतन राजपत्रित वर्ग -२ चे‎ नसल्याने महाराष्ट्र राज्य तहसीलदार‎ व नायब तहसीलदार संघटना यांनी‎ ग्रेड पे वाढवण्यासाठी वर्ष १९९८‎ पासून शासनाकडे वारंवार पाठपुरावा‎ केला. मात्र, संघटनेच्या मागणीबाबत‎ कोणताही विचार करण्यात आलेला‎ नाही. संघटनेने यापूर्वीही बेमुदत‎ बंदची नोटीस दिली होती. मात्र‎ महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात‎ कुठलीही दखल घेतलेली नाही.‎ यावर तहसीलदार संघटनेचे अध्यक्ष‎ किरण आंबेकर म्हणाले की, के. पी.‎ बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील वेतन‎ त्रुटी समितीला वारंवार निवेदन‎ देऊनही संघटनेच्या मागणीचा‎ कोणताही विचार करण्यात आलेला‎ नाही. आता तीन एप्रिलपासून बेमुदत‎ काम बंद आंदोलन करण्यात येणार‎ आहे. या वेळी विभागीय संघटक‎ विजय चव्हाण, महेंद्र गिरगे, परेश‎ खोसरे उपस्थित होते.‎ आयुक्त कार्यालयासमोर तहसीलदार, नायब तहसीलदारांनी आंदोलन केले.‎

बातम्या आणखी आहेत...